PM किसान योजनेचे पैसे पंतप्रधान स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवत आहेत; पहा त्याचे लाईव्ह प्रक्षेपण

किसानवाणी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे अवघ्या काही तासात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ऑनलाईन स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करणार आहेत. स्वर्गिय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून होत असलेल्या जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवण्याचे नियोजन मोदी सरकारने केले आहे. तब्बल ९ कोटी शेतकऱ्यांना १८ करोड रूपयांचा लाभ यामुळे काही तासातच मिळणार आहे.

या Youtube लिंकवर पहा लाईव्ह प्रक्षेपण

शेतकऱ्यांनी आजच्या पैसे येण्याच्या लिस्टमध्ये आपले नाव आहे का? याची एकदा खात्री करणेही गरजेचे आहे. त्यासाठी 👉 PM Kisan Installment list 👈  या लिंकवरून आपले नाव यादीत असल्याची खात्री करू शकता. तुमच्या खात्याचा तपशील जाणून घेण्यासाठी या लिंकवर 👉Beneficiary List👈  पाहू शकता. कारण आज (शुक्रवार २५ डिसेंबर २०२०) पीएम किसान योजनेतील पैसे खात्यात येणार असले तरी काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे पैसे मिळणार नसल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने नाव, खाते नंबर, आधार नंबर, यासारख्या बाबींमधील किरकोळ चुका, तांत्रिक दोष कारणीभूत आहेत. तसेच जे शेतकरी इन्कम टॅक्सधारक आहेत, इतर व्यवसायात आहेत अशा शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.

आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील आत्तापर्यंतचा सातवा हप्ता तर यंदाच्या आर्थिक वर्षातला हा तिसरा हप्ता आहे. मोदी सरकार वर्षातून ३ वेळा प्रति हप्ता २००० प्रमाणे शेतकऱ्यांना शेती बि-बियाणे, औषधे, खते यासारख्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी हे पैसे देत आहे. ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून शेतकरी वर्गाकडून हप्त्याचे पैसे कधी मिळणार याबाबत नेहमी उत्सुकता असल्याचे पहायला मिळते.