Homeबातमी शेतीचीभारतबंद यशस्वी करण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येणार

भारतबंद यशस्वी करण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येणार

किसानवाणी :
मोदी सरकारने केलेले ३ वादग्रस्त शेती कायदे रद्द करावेत या मागणीसाठी ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेला भारतबंद यशस्वी करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमधील शेतकरी संघटनाना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आंदोलनात देशातील काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही सामील होणार आहेत, त्याचबरोबर निदर्शनात ही सहभागी होणार आहेत. 

दरम्यान, रविवारी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदमध्ये काँग्रेस सामील असल्याचे जाहीर केले असून सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असे सांगितले आहे. या बंदमध्ये काँग्रेसव्यतिरिक्त महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस, प. बंगालमधून तृणमूल काँग्रेस, बिहारमधून राष्ट्रीय जनता दल, उ. प्रदेशातून राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते सामील होणार आहेत. डाव्या पक्षांमध्ये माकप, भाकप, माकप (माले), आरएसपी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हे पक्ष सामील होणार आहेत.

वादग्रस्त शेतकरी कायदे रद्द करावेत यासाठी पंजाब, हरयाणा, उ. प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमधील शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक राहणार आहे. या बंदमध्ये देशातल्या ४०० हून अधिक शेतकरी संघटना सामील होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments