बापरे! ‘ह्या’ म्हैशीची किंमत तब्बल 51 लाख..!

किसानवाणी : पंजाब मध्ये एक पशुपालक शेतकऱ्याकडे तब्बल 51 लाखांची म्हैस आहे. ह्या म्हैशीचे नाव ‘सरस्वती’ असून ती तिच्या किंमतीमुळे एखाद्या फिल्म स्टार सारखी फेमस आहे. ही म्हैस चर्चेत असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तिची लक्षणीय किंमत. सरस्वती म्हैस हि पंजाब मधील लुधियाना येथील पशुपालक शेतकरी पवित्र सिंह ह्यांनी हरियाणाच्या पशुपालक शेतकऱ्याकडून 51 लाख रुपयाला खरेदी केली आहे.

सरस्वती प्रमाणेच तिच्या पारडूची किंमत ही तगडी आहे. जन्माला येण्यापूर्वीच त्याच्यावर बोली लावली गेली असून तब्बल 11 लाख रुपयाला विकले गेले आहे. सरस्वती म्हशीचे मालक पवित्र सिंह ह्यांच्याकडे 17 एकर शेती आहे, तसेच ते पशुपालन देखील करतात. यातून ते चांगली कमाई करतात. त्यांच्याकडे 12 गायी आणि 4 म्हैशी आहेत.

‘सरस्वती’ का आहे एवढी महाग
सरस्वती म्हैस हि किमतीमुळे आणि तिच्या दुध उत्पादन क्षमतेमुळे प्रसिद्ध आहे. सरस्वतीने दिवसाला 33.131 लिटर दुध देऊन विक्रम केला आहे. ती जगातली सर्वात दुध देणाऱ्या म्हैशीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान मधील नजा ह्या म्हैशीच्या नावावर सर्वात जास्त दुध देण्याचा विक्रम आहे. नजा म्हैशीने एका दिवसात 33.800 लिटर दुध देऊन हा विक्रम तिच्या नावावर केला आहे. पवित्र सिंह सांगतात की, लवकरच सरस्वती नजा म्हैशीचा हा विक्रम मोडीत काढेल आणि नवीन विक्रम प्रस्थापित करेल.

सरस्वतीचा खुराक नेमका आहे तरी काय?
सरस्वतीचा खुराक/आहार हा सामान्य म्हैशी सारखाच आहे. तिला इतर पशुप्रमाणे फक्त चारा आणि धान्य दिले जाते. सामान्य म्हैशीसारखाच आहार असून देखील सरस्वती इतर म्हैशीपेक्षा जास्त दुध देत आहे. त्यामुळेच सरस्वती इतकी महाग आहे. तिच्या देखरेखीसाठी दोन कर्मचारी तैनात आहेत.