निर्माल्यातील फूलांपासून ‘अंकित’ने उभारला करोडोंचा व्यवसाय; जाणून घ्या त्याची अनोखी यशोगाथा

किसानवाणी : भारतामध्ये दररोज हजारो टन फुलं निर्माल्यरुपात जमा होतात. पण आता एक कंपनी या वाया गेलेल्या फुलांना नवीन आयुष्य देतेय. दररोज १२ टनापेक्षा अधिक फुलांचं निर्माल्य विविध मंदिरातून जमा करून, त्यावर प्रक्रिया करतेय. या प्रक्रियेतून उदबत्ती बनविण्याचा एक आगळा-वेगळा प्रकल्प या कंपनीने उभारलाय. हा सुगंधी प्रयोग निर्माल्यातील फुलांपासून निर्माण होणारा कचरा कमी करण्यास मदत करीत आहेच, त्याचबरोबर निसर्गात होणारे प्रदूषणही कमी करण्यास हातभार लावतोय. ‘फूल’ असे या कंपनीचे नाव असून अंकित अग्रवाल या आयआयटी मधून शिक्षण घेतलेल्या धाडसी तरूणाने याची सुरवात केलीय. त्याच्या या अभिनव प्रयोगाची यशोगाथा पाहूया ‘या’ व्हीडीओच्या माध्यमातून.