Homeयशोगाथाबांबू शेतीसाठी सरकार देतयं भरघोस अनुदान, जाणून घ्या करोडोची कमाई करून देणाऱ्या...

बांबू शेतीसाठी सरकार देतयं भरघोस अनुदान, जाणून घ्या करोडोची कमाई करून देणाऱ्या ‘या’ शाश्वत शेतीविषयी

किसानवाणी : बांबू शेतीविषयी जाणून घेण्याआधी ‘या’ शेतकऱ्याची ‘ही’ यशोगाथा पहा, मगच ठरवा यातून करोडोची कमाई कशी होते..

देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. नॅशनल बांबू मिशन (National Bamboo Mission)  याच योजनेचा एक भाग आहे. बांबू शेतीच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांची कमाई करू शकतात. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जात असून नॅशनल बांबू मिशनच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जातात. शेतक-यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी “अटल बांबू समृध्दी योजना” या नावाने नवीन योजना राबविण्यास देखील शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

बांबू शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी नर्सरीमधून रोपे उपलब्ध होतात. बांबूच्या देशभरात १३६ जाती उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या जातीचे बांबू वापरले जात असून यात १० बांबूच्या जाती अधिक लावल्या जातात. उपयोगानुसार बांबूच्या जातीची निवड करावी लागते. म्हणजेच जर फर्निचरसाठी बांबू हवे आहेत तर त्यासाठी वेगळ्या बांबूच्या रोपांची निवड करावी लागेल.

बांबूची यशस्वी शेती करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील राजशेखर पाटील यांची ही यशोगाथा नक्की पहा..
पाटील यांनी २० वर्षांपूर्वी बांबूच्या शेतीला सुरवात केलीय. पाटील यांची ५४ एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी वेगवेगळ्या पारंपारिक पिकांचे प्रयोग केलेत. परंतु प्रत्येकवेळी त्यांना अपयश येत होत. यातून मार्ग काढता काढता राजशेखर पाटील बांबू शेतीकडे कधी वळले हे त्यांच त्यांनाच समजलेलं नाही. सुरवातीला त्यांनी आपल्या ५४ एकरातील फळबागेसाठी कुंपण म्हणून ४० हजार बांबूची रोपे लावली होती… आणि या कुंपणरूपी ४० हजार रोपांपासून त्यांना तब्बल १० लाख बांबू विक्रीस उपलब्ध झाले. या १० लाख बांबूनी त्यांना थोडे थोडके नाही तर तब्बल ५ कोटींची कमाई करून दिलीय. तर आता उपलब्ध असणाऱ्या बांबूपासून त्यांना तब्बल ५० कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

५४ एकरात ५० कोटींचे उत्पन्न..! चंदन शेतीपेक्षा फायदेशिर शेती; पहा ‘ही’ यशोगाथा

किती दिवसात तयार होते बांबू शेती –
साधारण चार वर्ष बांबूच्या शेतीला लागतात, चौथ्या वर्षापासून बांबूची तोडणी सुरू होते. बांबूची लागवड दोन झाडांमध्ये तीन – चार मीटर अंतरावर केली जाते. या अंतरात आपण दुसरे पीक घेऊ शकतो.

बांबू शेतीचे इतर फायदे – 
बांबूची पाने गुरांना चारा म्हणून दिली जातात. बांबूमुळे पर्यावरणाचे रक्षण होते. माती संवर्धनाचे महत्वाचे काम बांबू शेती करते. तसेच फर्निचरसाठी लागणाऱ्या लाकडासाठी मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीलाही आळा घातला जातो.

बांबू शेतीला किती खर्च येतो  
तीन वर्षासाठी एका रोपास २४० रुपयांचा खर्च येतो. यात सरकारकडून प्रति रोपासाठी मदत मिळते. उत्तरेकडील पूर्वेच्या भागात शेतकऱ्यांसाठी सरकार ५० टक्के मदत करते. ५० टक्के सरकारी सहभागात ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य सरकार मदत करत असते. तर नार्थ – ईस्टमध्ये ६० टक्के सरकार आणि ४० टक्के शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. ६० टक्के सरकारी पैशात ९० टक्के केंद्र आणि १० टक्के राज्य सरकारचा भाग असतो. याची सविस्तर माहिती जिल्हातील नोडल अधिकाऱ्याकडे मिळेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनुदानाची सविस्तर माहिती पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
बांबू शेती अनुदान –

कमाई किती होईल – 
एका हेक्टरमध्ये १५०० ते २५०० रोपे लावू शकतो. जर आपण ३ गुणा २.५ मीटरमध्ये रोपांची लागवड केली तर एका हेक्टरमध्ये १५०० रोपांची लागवड होऊ शकते. त्यामुळे दोन रोपांमध्ये दुसरे पिके घेता येते. ४ वर्षानंतर ३ ते ३.५ लाख रुपयांची कमाई होते. तसेच तुमच्या परिसरातील मागणी आणि मार्केटनुसार अधिक फायदा ही होऊ शकतो.
बांबू शेतीमध्ये प्रत्येक वर्षी लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूची शेती ही ४० वर्षापर्यंत करता येते. जर आपण ४ बाय ४ च्या अंतरात रोपे लावाली तर त्यात आपण रिकाम्या जागेत दुसरे पीकापासून देखील काही वर्ष चांगली कमाई होते. आणि बांबू शेतीचे उत्पन्न सुरू झाल्यावर ही शाश्वत कमाई सुरू होते.

बांबूपासून आपण कंस्ट्रक्शनचे काम करू शकतो. यापासून आपण घर बनवू शकतो. प्लोरिंग करू शकतो. फर्निचर बनवू शकतो. हॅण्डीक्राफ्ट आणि ज्वेलरी बनवू शकतो. कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इंस्टीट्यूट (सीबीआरआय), रुड़की ने ही कंस्ट्रक्शनमध्ये काम करण्यास मंजुरी दिली आहे. घराच्या छतावर सिमेंटऐवजी बांबूच्या सीट कौल तयार केले जात आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संपर्क :
Shri. TSK Reddy
SMD (NBM) & Addl. PCCF & Managing Director
Maharashtra Bamboo Development Board, Adjacent Katol Naka Toll Katol Road, Nagpur-440013, Maharashtra
Tel: 0712-2542595, Mob: 7773932046
Email: mahabamboo@mahaforest.gov.in, saireddy5599@gmail.com 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments