Saturday, January 28, 2023
HomeWeatherसावधान! आणखी एक 'चक्रीवादळ' येतयं..; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, 'गुलाब' चक्रीवादळापेक्षाही भयावह...

सावधान! आणखी एक ‘चक्रीवादळ’ येतयं..; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, ‘गुलाब’ चक्रीवादळापेक्षाही भयावह – IMD

मुंबई | बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्रप्रदेशसह, ओडिशा आणि महाराष्ट्राला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) फटका बसला आहे. हे संकट कायम असताना महाराष्ट्रासह गुजरात राज्याला आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं (IMD Alert) दिला आहे.

चक्रीवादळ आता कुठे आहे पहा (LIVE) (👈 क्लिक करून पहा Live Cyclone)

हे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होणार असून याला ‘शाहीन’ असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव ओमान देशानं दिलं आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र आणि गुजरातसाठी पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्रामुळे ते अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. हे चक्रीवादळ 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. तिथे पोहचल्यानंतर त्याचं रुपांतर वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. या वादळाच्या हालचालींवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं IMD नं म्हटलं आहे.

IMD नं दिलेल्या माहितीनुसार, ‘शाहीन’ चक्रीवादळ ‘गुलाब’पेक्षा भयावह असून त्याची तीव्रता जास्त असणार आहे. मात्र हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमी किनाऱ्यावर धडक न देता ओमानच्या दिशेनं निघून जाईल, अशी देखील शक्यता आहे. मात्र, वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना बुधवारी रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. गोंदिया भंडारा आणि गडचिरोली ही तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्यात आज येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचं आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात (Konkan) अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 जनावरं दगावली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments