Homeबातमी शेतीचीसोयाबीन सदोष बियाणे प्रकरण : अखेर 'त्या' तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल!

सोयाबीन सदोष बियाणे प्रकरण : अखेर ‘त्या’ तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल!

किसानवाणी :
खरीप हंगामातील प्रमुख पीक सोयाबीन यंदा अडचणीत सापडण्याती चिन्हे आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. कंपन्यांनी सदोष बियाणांचा पुरवठा केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान याचा विचार करून प्रशासनाने बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरवात केलीय. बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन कंपन्यांविरोधात असे गुन्हे दाखल झाले आहेत. 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी सुरू आहेत. यात एकट्या बीड जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विकणाऱ्या ग्रीन गोल्ड कंपनीवर परळीमध्ये तर जानकी व यशोधा या कंपन्यांवर बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सीड्स या औरंगाबादच्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याचप्रमाणे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याच्या जानकी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड व हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील यशोधा हायब्रीड सीड्स या कंपन्यांवर सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

यावर्षी पहिल्यांदाच मागच्या काही वर्षांमध्ये जून महिन्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पेरणीने जोर धरला होता. बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा हा जवळपास दोन लाख हेक्टरवर केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर ते उगवत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. मागच्या तीन आठवड्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत.

कृषी विभागाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये न उगवलेल्या सोयाबीनचा पंचनामा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण करून कृषी विभागाने तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरूध्द तक्रार दिली होती. बीड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. या शेतकऱ्यांचा एकरी पेरणीचा खर्च दहा हजार रुपये गृहीत धरून १५७ शेतकऱ्यांचे एकूण १ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कृषी विभागाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments