Homeयशोगाथागोमूत्र आणि शेणातून फायदेशिर गोपालन, सांगली जिल्ह्यातील तरूणाची प्रेरणादायी यशोगाथा..!

गोमूत्र आणि शेणातून फायदेशिर गोपालन, सांगली जिल्ह्यातील तरूणाची प्रेरणादायी यशोगाथा..!

किसानवाणी :
नेहमीच्या दूग्ध व्यवसायाची रीघ तोडत सांगली जिल्ह्यातील सुहास पाटील यांनी गो- मूत्र आणि शेणावर प्रयोग करत एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या नव्या व्यवसायाने युवकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात अससलेल्या औदुंबर गावातील सुहास प्रभाकर पाटील यांची यशकथा जाणून घेणार आहोत. 

सुहास पाटील यांनी वाणिज्य शाखेमधून (बी.कॉम) पदवी घेतली असून ते सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील औदुंबर गावी गोपालनंदन नावाची गो-शाळा चालवतात. मला काय करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर शोधत सुहास पाटील यांनी देशी गायीपासून दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. काही काळ दुधाचा व्यवसाय केल्यानंतर अर्थशास्त्र बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी गोमूत्र आणि शेणातून औषध निर्मितीच्या व्यवसायाला सुरूवात केली. यासोबतच ते दूध आणि तुपाचा देखील व्यवसाय करत आहेत. 

गेल्या वीस वर्षापासून ते या व्यवसायात आहेत, या व्यवसायात त्यांनी पुर्ण शास्त्र अवगत केले असून ते आता युवकांना याचे प्रशिक्षणदेखील देतात. सर्वच क्षेत्रातील लोक त्यांच्याकडे सध्या प्रशिक्षणासाठी येतात. सुरुवातीच्या काळात फोटोग्राफीचा छंद जोपासणारे सुहास यांना गावात राहून काही तरी काम करायचे होते. पण काय करावे, कोणता व्यवसाय करावा हा मार्ग सापडत नव्हता. फोटोग्राफी करत असताना ते एका कार्यक्रमात फोटो काढण्यासाठी गेले होते. तो कार्यक्रम काही देशी गायीविषयी माहिती देणारा होता. आणि या कार्यक्रमातच त्यांना देशी गोपालनाची कल्पना सुचली. देशी गाई पालनातून दूध व्यवसाय करायचा असा निश्चय त्यांनी केला. त्या कार्यक्रमापासून गोपालनंदन या गोशाळेचा प्रवास सुरू झाला.  

देशी गाईनंतर त्यांनी हळूहळू गीर, सहिवाल या जातीच्या गाई आपल्या गो-शाळेत आणल्या, परंतु दुधाचे अर्थशास्त्र कुठेतरी बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाटील यांनी दुसरा व्यवसाय सुरु करायचा विचार केला. पण देशी गाईमध्ये काहीतरी जोड व्यवसाय असावा असे त्यांना सारखे वाटत होते. त्यातूनच सुहास पाटील यांनी देशी गाई या विषयात अभ्यास करीत औषध निर्मिती करण्याचा निर्धार केला.

सुहास पाटील म्हणतात, सर्व दुग्धव्यवसाय करणारे लोक दुध कसे अधिक निघेल याच्यामागे आहेत पण, दूध हे फक्त बोनस आहे खरी बक्कळ कमाई तर गोमूत्र आणि शेणांमध्ये आहे. गोमूत्र आणि शेणापासून सुहास पाटील औषध तयार करतात. शेतीसाठी लागणाऱ्या गोमूत्राचा दर हा ५० रुपये लिटर आहे.  तर त्यातील अर्क काढला तर ते गोमूत्र ३०० ते ८०० रुपये लिटरने विकले जाते. डोळ्यात टाकण्याचे औषधदेखील गोमूत्रपासून बनवले जाते, त्याची किंमत एका लिटरसाठी १५ हजार रुपये असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.पाटील यांच्याकडे विविध आजारांवरती गोमूत्रापासून औषधे बनवली जातात.  पोटाचे विकार, रात्री झोप न येणे, केस गळणे, मतीमंदपणा, पक्षाघात, या विकारांवर गोमूत्रापासून औषध बनवले जाते.  इतकेच काय मुळव्याधीसाठी सुद्धा सुहास पाटील यांच्याकडे औषध आहे. या औषधांना प्रचंड मागणी असून औषधांची किंमत १५ रूपयांच्या हजारांच्या घरात आहे. हे दर पाहून नक्कीच आपल्याला याची कल्पना येईल की, दुधापेक्षा गोमूत्र भरपूर उत्पन्न देते.

सध्या अनेकजण गोशाळा चालू करतात पण नेमके कशात काय कमवायचे आहे, याची माहिती नसल्याने आणि सखोल अभ्यास नसल्याने गो-शाळा काही महिन्यातच बंद पडतात. त्यामुळे नवीन गो-शाळा सुरू करणाऱ्यासाठी ते कार्यशाळा देखील घेतात.  ज्यांना या व्यवसायात उतरायचे आहे त्यांनी काही प्रश्न तयार केली पाहिजे, त्यांची उत्तरे काढून काम सुरू केले पाहिजे.  ”गो-शाळा का चालू करायची? काय काम करायचे आहे? आपल्याला सुरु करायचा असलेला व्यवसाय याची माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरे काढल्यानंतर आपण कामाला सुरुवात करा”, असा सल्ला सुहास पाटील युवकांना देतात.

तुपाचा व्यवसाय करताना आधी मागील गणित समजून घेतले पाहिजे. आपण जर तुप औषधी गुण सांगून विकले तर नक्कीच याचा चांगला दर आपल्याला मिळेल. कशापद्धतीने याचा वापर केला गेला पाहिजे. जूने तुप आहे तर त्याचा उपयोग कसा करायचा. विकताना आपल्याला याची माहिती असली पाहिजे. सुहास पाटील यांच्या गोशाळेत तयार होणाऱ्या तुपाला साधरणत: ३ हजार रुपये इतका दर आहे. तुप बनविण्याची पद्धत आणि त्याला ठेवण्याची पद्धत यात खूप मेहनत असल्याचे पाटील म्हणतात. नैसर्गिक पद्धतीने तूप तयार केले जाते यामुळे या तुपाला खूप मागणी असून भावही दमदार मिळतो.बरेच लोक असतात जे तुप तयार करतात पण तूप विकल्या जात नाही. यामागे एक कारण असते व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला त्याची पुरेशी माहिती नसते. औषधी गुण काय आहेत याची कल्पना आपल्याला असायला हवी. दुधातही पैसा असतो पण आपण योग्य पद्धतीने व्यवसाय केला तरच त्यात आपल्याला पैसा दिसत असतो. दुधापासून तुम्ही तूप बनवून विकता, पण त्याला हवा तसा दर मिळत नाही. यामुळे तुम्ही निराश होता परंतु तुम्ही गवळी म्हणून नाही तर व्यावसायिक म्हणून तुपाचे औषधी गुण सांगून त्याची विक्री केली पाहिजे. तर आपल्या मालाला चांगला भाव मिळेल असे पाटील यांचे म्हणणे आहे. 

अधिक माहितीसाठी आपण सुहास पाटील यांना सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपर्क करु शकता. किंवा त्यांच्या गोशाळेत जाऊन आपण त्यांच्याकडील औषधांची माहिती घेऊ शकता.
सुहास पाटील
मोबाईल – ७४४८२८५०००, ७०३८६२५०००.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments