HomeयोजनाPM Kisan योजनेसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता 'हे' कार्ड असेल तरच...

PM Kisan योजनेसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ कार्ड असेल तरच मिळणार २ हजार रुपये

किसानवाणी : देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनेक राज्यांतून फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारनं नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्डची गरज लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य असणार आहे. रेशन कार्डवर नाव असणाऱ्या घरातील लोकांपैकी एकाला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव – 26/10/2021

केंद्र सरकारने नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करत या योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. आधी सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि प्रतिज्ञापत्र यांची हार्ड कॉपी जमा करणे अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र आता या कागदपत्रांची पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावी लागणार आहे त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी होईल असा सरकारला विश्वास आहे.

या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटवर जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना ९ हप्ते मिळाले असून लवकरच १० वा हप्ता जमा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments