Homeबातमी शेतीचीशेतकऱ्यांना खूश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अपुरा? कृषी क्षेत्रासाठी मोजक्याच घोषणा

शेतकऱ्यांना खूश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अपुरा? कृषी क्षेत्रासाठी मोजक्याच घोषणा

किसानवाणी
केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीमध्ये विविध ठिकाणी सरकार विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. सितारामन यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी कृषी पत लक्ष्य (Agriculture Credit Target) वाढविण्याविषयी माहिती दिली. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की 2021-22 मध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कृषी पतपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. गेल्या वर्षी हे लक्ष्य 15 लाख कोटी होते, त्यामध्ये यावर्षी 1.5 लाख कोटींची वाढ होऊन हे लक्ष्य 16.5 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.

अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. सर्व पिकांवर उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी देण्यात येत आहे. सरकारने असा दावा केला आहे की, पुढील वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. गेल्या 7 वर्षामध्ये शेतकऱ्यांकडून दुपटीपेक्षा अधिक धान्य खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये सरकारकडून करण्यात येणाऱ्या पेमेंटमध्येही तेजी आली आहे.

एपीएमसी विकसित करण्याबाबत सरकारने राज्य नियंत्रित मंडईंच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक लाख कोटी रुपयांच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडला परवानगी दिली आहे. तसेच नवीन कृषी कायद्याअंतर्गत सरकार मंडई प्रणाली नष्ट करू इच्छित असल्याचा शेतकऱ्यांचा समज दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments