Saturday, January 28, 2023
HomeGovt. schemeशेतकरी बंधूनो ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे? 'या' योजनेतून मिळेल ५ लाख रूपयांचे...

शेतकरी बंधूनो ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे? ‘या’ योजनेतून मिळेल ५ लाख रूपयांचे अनुदान, ‘असा’ करा अर्ज…

किसानवाणी :
राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या दृष्टीने राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीने विविध योजना राबवत आहे. केंद्र पुरस्कृत ‘कृषि यांत्रिकीकरण’ ही योजना यापैकीच एक असून ही योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवरटिलर, भात लागण यंत्र, रीपर कम बाईडर, पॉवर विडर, कल्टीव्हेटर, रोटाकल्टीव्हेटर, पल्टी नांगर, प्लॅंटर, सीडर, वीड स्लॅशर, शुगरकेन थ्रॅश कटर, ट्रॅक्टर माऊंटेड/ऑपरेटेड स्प्रेयर, मीनी राईसमील, मीनी डाळमील, पॅकिंग मशीन यासारखी इतर विविध औजारे अनुदान तत्वावर दिली जातात.

ट्रॅक्टर साठी २ लाखापासून ५ लाखापर्यंत अनुदान देय आहे. तर इतर औजारांसाठी देखील १२ हजारापासून ३ लाखापर्यंत अनुदान दिले जात आहे. यामध्ये राज्य सरकार देखील आपला हिस्सा देत असून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अर्थसहाय्य करीत आहे. याबरोबरच नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्हे म्हणून केला असून इथल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे आहे. अनुदानाची औजारनिहाय संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कृपया Krushi-Vibhag या लिंकवर जाऊन पाहावे.  

आवश्यक कागदपत्रे  –

७/१२, ८ अ, आधार लिंक बँक पास बुक, आधार कार्ड, घेण्यात येणाऱ्या यंत्र औजारांचा मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, अ. जा /अ. ज  लाभार्थी साठी जातीचा दाखला, पास पोर्ट आकाराचा फोटो

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज  सादर करण्याची पद्धत फक्त ऑनलाईन द्वारे उपलब्ध असेल. अन्य कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आपले सरकार DBT मुख्यपृष्ट पाहण्यासाठी आपले सरकार DBT च्या  https://mahadbtmahait.gov.in  या  वैध युआरएल चा वापर  करावा. शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले  सरकार DBT च्या पोर्टल वरून नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज  करू शकतात. तसेच केलेल्या अर्जाची  सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून कधीही पाहू शकतात. आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरावर अर्जदारांना एसएमएस आणि  ईमेल अलर्टची सुविधाही उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments