Saturday, February 4, 2023
HomeGovt. schemeशेतकऱ्यांना सुवर्णसंधी : नापिक जमिनीत उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार राबवतय 'ही'...

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी : नापिक जमिनीत उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार राबवतय ‘ही’ महत्वाकांक्षी योजना

नाशिक | केंद्र सरकारव्दारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध योजना राबवल्या जातात. याच उद्देशाने केंद्र सरकारने नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) सुरु केली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून किंवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे.

या योजनेअंतर्गत ०.५ ते २ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने, शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि पाणी वापरकर्ता संघटना (डब्ल्यूयुए) हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करु शकतात. जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. विकासक आणि जमीन मालक यांच्यात भाडेपट्टी करार केला जाईल, त्या भाडेपट्टी कराराद्वारे जमिन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.

या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ के व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल. प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) अंतर्गत या योजनेमध्ये टेंडरद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि पाणी वापरकर्ता संघटना (डब्ल्यूयुए) यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत.

तथापी, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. बयाणा रक्कम (इएमडी) रु. १ लाख/ मेगावॅट, परफॉर्मनस बँक गॅरंटी (पीबीजी) रु. ५ लाख मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून १२ महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वन करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून २५ वर्षाकरिता रु. ३.१० प्रति युनिट दराने राहील.

कुसूम योजनेची अधिकृत वेबसाईट – www.mnre.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments