Homeयोजनाट्रॅक्टर खरेदीसाठी स्वस्त दरातील कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..!

ट्रॅक्टर खरेदीसाठी स्वस्त दरातील कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..!

शेतकरी बंधूना शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रणा खरेदी करताना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी वर्गाची ही अडचण ध्यानात घेत भारतातील सर्वात मोठी बॅंक अर्थात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफर मध्ये एसबीआय शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्यात येत आहे. ही ऑफर नव्या ट्रॅक्टर लोन योजनेच्या अंतर्गत दिली जात आहे. 

कर्जाची वैशिष्ट्ये, पात्रता, प्रोसेसिंग फी, आणि कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
एसबीआयच्या ट्रॅक्टर लोनची वैशिष्ट्ये –
कर्जाच्या रक्कमेत ट्रॅक्टरची किंमत, उपकरणे, अवजारे, विमा आणि नोंदणीचा खर्चाचा समावेश असेल. कर्जाच्या रक्कमेवर कोणताही चार्ज आकारला जात नाही. आवश्यक असलेली कागदपत्रे जमा केल्यानंतर मोजून एका आठवड्यात कर्ज मंजूर होते. यासह कर्जाची परतफेड करण्यासाठी महिना, तीन महिने, किंवा वर्ष या पर्यायाची निवड करता येते. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यावर व्याजदरात १ टक्क्यांची सूट मिळते. कर्जासाठी तारण म्हणून कर्ज रक्कमेच्या किंमतीपेक्षा कमी तारणावरही कर्ज मिळते. ट्रॅक्टर, उपकरणे, विमा आणि नोंदणी खर्चाच्या रक्कम १५ टक्के मर्जिन करण्यात आली आहे.

व्याज दर काय आहे – 
व्याज दर: 11.95% पी.ए.डब्ल्यू.ई.एफ 01.05.2016 असेल.
कर्ज फेडण्याचा कालावधी आहे ५ वर्ष १ महिना इतका आहे. 

एसबीआय न्यू ट्रॅक्टर कर्ज योजना – पात्रता
अर्जदाराच्या नावे किमान २ एकर जमीन असणे आवश्यक आहे. 

एसबीआयनवीनट्रॅक्टरकर्जयोजनाःआवश्यककागदपत्रे

 • पूर्व मंजुरी
 • योग्य रित्या भरलेला अर्ज
 • नवीनतम पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
 • ओळख पुरावा: मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड
 • पत्ता पुरावा: मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड
 • जागेचा कागदोपत्री पुरावा
 • डिलरने ग्राहकांना दिलेला ट्रॅक्टर कोटेशन
 • पॅनेल वकीलांकडून शीर्षक शोध अहवालपूर्व वितरणकर्जाची कागदपत्रे
 • तारणासाठी जमिनीचे कागदपत्र
 • दिनांकित धनादेश
 • पोस्ट वितरण एसबीआयच्या बाजूने हायपोथेकेशन शुल्कासह आरसी बुकग्राहकाला डीलरद्वारे दिलेले मूळ चलन / बिल
 • सर्वसमावेशक विमा प्रत

एसबीआय नवीन ट्रॅक्टर कर्ज योजनाः प्रक्रिया शुल्क आणि फी
शुल्काचेवर्णन
लागू शुल्क
पूर्व देय –  शून्य
प्रक्रिया शुल्क- 0.5%
भाग देय-  शून्य
डुप्लिकेट  – नाही देय प्रमाणपत्र – शून्य
मुद्रांक शुल्क – लागू आहे
उशीरा देय दंड
डिलिव्हरीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत वाहन नोंदणी न झाल्यास दंड
डीफॉल्ट कालावधीसाठी २% अयशस्वी एसआय (प्रति एसआय)
रु. २५३/ – अयशस्वी ईएमआय (प्रति ईएमआय)
अयशस्वी ईएमआय (प्रति ईएमआय) ५६२ रुपये

Source: https://sbi.co.in/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments