पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार की नाही हे तपासा काही मिनिटात

किसानवाणी | पीएम किसान योजनेत नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्याप आपणास एकही हप्ता (आर्थिक मदत) मिळालेला नाही तर तो आपणास मिळेल की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने आता चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकर्‍यांसाठी एक महत्वाची सरकारी योजना असून  या योजनेंतर्गत सरकार प्रत्येक शेतकऱ्याला तीन समान हप्त्यात वर्षाकाठी ६००० रूपये देत आहे.  आतापर्यंत नऊ कोटीहून अधिक शेतकर्‍यांना या सरकारी योजनेचा लाभ मिळाला आहे. 

पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर नाव नोंदणी होऊन देखील अद्याप अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. नाव नोंदणी आणि पोर्टलवरील यादी नाव असलेल्या अशा शेतकऱ्यांसाठी आता पैसे मिळणार की नाही हे एका फोन कॉलवर जाणून घेता येणार आहे. त्यासाठी सरकारने (011)24300606 हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांच्या रजिस्टर्ड नंबर वरून या नंबरवर कॉल करता येणार  आहे. 

वास्तविक, पीएम किसान योजनेसाठी पात्र असूनही, जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही अडचण उद्भवलेल्या असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्डमधील तुमचे नाव बँक खात्यापेक्षा वेगळे असू शकते. आयएफएससी कोड किंवा खातेनंबरात झालेली चूक, नागरी बॅंक किंवा एखाद्या ग्रामीण बॅंकेत असेलेले खाते; जे डीबीटी साठी पात्र ठरत नाही, त्यामुळे या चूका दुरूस्त करून खाली दिलेल्या सूचनानुसार अनुसरण करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

  1. पंतप्रधान-किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा – pmkisan.gov.in
  2. मुख्यपृष्ठ मेनूवर शेतकरी कॉर्नर शोधा आणि आधार तपशील संपादित करा पर्यायावर क्लिक करा.
  3. आता आपला आधार नंबर येथे प्रविष्ट करा.
  4. यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा
  5. सबमिट बटणावर क्लिक करा.

टीप – आपले नाव केवळ चुकीचे असल्यास आपण ते ऑनलाइन सुधारू शकता. इतर कोणतीही चूक असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा.

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाल्याचे पहायला मिळाले. सरकारच्यावतीने लॉकडाऊनमुळे जुन पर्यंत दिला जाणारा हप्ता एप्रिल महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. तर आता ऑक्टोबरपर्यंत दिला जाणारा हप्ता १ ऑगस्ट पासूनच दिला जाणार आहे.  

पंतप्रधानकिसान महत्वाचे दुवे
 आधार तपशील येथे संपादित करा 
– लाभर्थ्यांची स्थिती तपासा
– पंतप्रधान-किसान यादी तपासा