Homeबातमी शेतीचीअतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर; 'या' ठिकाणांना देणार भेट

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर; ‘या’ ठिकाणांना देणार भेट

किसानवाणी :
राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यावेळी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

 • सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
 • सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण. (अक्कलकोट मार्गे)
 • सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा.
 • सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी.
 • सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहराकडे प्रयाण.
 • सकाळी 11:30 वा.अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी. 
 • सकाळी 11:45 वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण.
 • दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी.
 • दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण.
 • दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन व आपत्तीग्रस्त घरांची, शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी.
 • दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण.
 • दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, अभ्यागतांच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments