शेळीपालनाविषयी संपूर्ण मार्गदर्शन – डॉ. तेजस शेंडे

0
518

किसानवाणी :
शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय दिवसेंदिवस एक प्रमुख व्यवसाय म्हणून समोर येत आहे. कमी भांडवल आणि कमी जागेत करता येणारा हा व्यवसाय शिक्षित, अशिक्षित कुणालाही सहजरित्या करता येण्यासारखा आहे. शेळीपालनामध्ये इतर जनावरांच्या तुलनेत खाद्याचे प्रमाण कमी लागते, आणि उत्पन्नही त्यामानाने अधिक मिळते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्यांचे आहारव्यवस्थापन होते. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.

शेळीपालन करीत असताना शेळीपालन क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरते. आज आम्ही अशाच शेळीपालन क्षेत्रातील तज्ञ डॉ. तेजस शेंडे यांच्या मार्गदर्शनाचे व्हिडीओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.