मुंबई | एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता ‘जवाद’ चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस (Rain) सुरू आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्यास बुधवारी सुरुवात झाली आहे. गुरुवारी हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. शनिवारी हे वादळ आंध प्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही कोकण, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात किमान 17 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणखी 3 दिवस राहणार आहे.
सध्या हे चक्रीवादळ कुठे कुठे प्रभावी आहे याची लाईव्ह स्थिती आपण एका क्लिक वर देखील पाहू शकता.
चक्रीवादळ LIVE
https://www.windy.com/
मुंबईत कालपासून पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच रात्रभरही पाऊस कोसळत होता. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे.