पावसाचा जोर वाढल्याने अलमट्टी धरणातून ५२००० क्युसेक पाण्याचा विसर्ग

किसानवाणी : 
सध्या बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबक्षेत्रामुळे चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या विविध विभागातील धरणाची पाणी पातळी १०० टक्क्यांच्या आसपास आहे.

कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणांची पाणी पातळी आणि त्यांचा विसर्ग पाहिल्यास राधानगरी धरणात २३५.१४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. आज सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ८००, कोयनेतून १०५० तर अलमट्टी धरणातून ५२००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरमात सध्या १२३.०८१ टीएमसी पाणीसाठा आहे. तर कोयना धरणात १०४.६१२ टीएमसी पाणीसाठा आहे. 

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील इतर धरणांचा विचार करता, तुळशी ९८.६९ दलघमी, वारणा ९७४.१९, दूधगंगा ७१९.१२ दलघमी, कासारी ७८.०४ दलघमी, कडवी ७१.२४ दलघमी, कुंभी ७६.६१ दलघमी, पाटगाव १०५.१७ दलघमी, चिकोत्रा ४३.१२ दलघमी, चित्री ५३.४१, जंगमहट्टी ३४.६५ दलघमी, घटप्रभा ४३.५७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल.पा) ६.०६ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.