विहीर, ठिबक सिंचन, शेततळे, इलेक्ट्रिक मोटार साठी अनुदान हवयं? ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन..!

कृषि विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन २०२०-२१
(अर्ज करण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ उपलब्ध आहे)
नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इलेक्ट्रीक मोटर, ठिबक तुषार

अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी यापूर्वी राबवण्यात येत असलेली अनु. जाती उपयोजना (विशेष घटक योजना) सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने ५ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयाअन्वये सन २०१६-१७ पासून राबविणेत येत आहे. 

१. सदर योजनेमध्ये सन २०२०-२१ या वर्षात खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रक्कमेच्या मर्यादेत अनुदान अनुद्येय राहील.

अ.क्र.बाबउच्चतम अनुदान मर्यादा (रूपये)
१.नवीन विहीर२,५०,०००/-
२.जुनी विहीर५०,०००/-
३. इनवेल बोअरिंग२०,०००/-
४.पंपसंचासाठी२०,०००/- (१० अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंपसंच करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार १०० टक्के अनुदान देय राहील)
५.वीज जोडणी आकार१०,०००/-
६. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण१,००,०००/-
७. सूक्ष्म सिंचन –
ठिबक सिंचन
तुषार सिंचन

५०,०००/-
२५,०००/-

सदरची योजनांतर्गत लाभासाठी शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारणेत येणार आहेत. याकरिता मागील वर्षाप्रमाणेच सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील राज्यातील अनुसूचित जाती/अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा (योजनेचे https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ) उपलब्ध आहे.

२. सदर योजनेअंतर्गत वरील ७ बाबी असून लाभ हा पॅकेज स्वरूपात द्यावयाचा आहे. खालील तीन पॅकेजमधील एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुद्येय राहील. 
पॅकेज १. नवीन विहीर – नवीन विहीर, पंपसंच, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन व आवश्कतेनुसार इनवेल बोअरिंग. 
पॅकेज २. जुनी विहीर दुरुस्ती- जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग. 
पॅकेज ३. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज- ज्या अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्याने ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे त्याच शेतकऱ्यांना अ.क्र.२,३ अंतर्गत या पॅकेजचा लाभ घेता येईल. 

 • ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना पंपसंच, वीज जोडणी आकार व सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देय राहील.
 • सोलर पंपासाठी अनुदान – ज्या शेतकऱ्यांना महावितरण कडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपसंच, वीडजोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रू. ३०,०००) लाभार्थी हिश्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.

योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी

 1. लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकरी असावा.
 2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
 3. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान ०.४० हेक्टर (१ एकर) व कमाल ६.०० हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. सामुहिक शेतजमिन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
 4. ज्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान ०.२० क्षेत्र असणे आवश्यक आहे.
 5. सदर योजनेअंतर्गत कमाल शेतजमिनीची अट ६.०० हेक्टर आहे.
 6. शेतकऱ्याच्या नावे जमिनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील).
 7. लाभार्थीकडे आधार कार्ड, बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
 8. अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्याचे सर्व मार्गाची मिळणारे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजार पर्यंतचा तहसिलदार यांचा २०१९-२० चा दाखला.
 9. लाभार्थीस लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस अर्थात ग्रामसभा ठराव.
 • मा.श्री.बजरंग पाटील – मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर.
 • मा.श्री.सतीश पाटील – मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर.
 • मा.श्री.संजयसिंह चव्हाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर.
 • मा.श्री.अजयकुमार माने – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर.
 • मा.श्री चंद्रकांत सुर्यवंशी – कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर.
Kisanwani: