‘या’ कारणांमुळे भारतातून सोयाबीनची निर्यात वाढून दरात तेजी येणार..

किसानवाणी : अमेरिकेच्या कृषि विभागाचा नोव्हेंबरचा अंदाज सोयाबीन बाजाराला आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. कारण जागतिक बाजारातील व्यापाऱ्यांना उत्पादन वाढीचा आकडा बाहेर येईल अशी अपेक्षा होती. मात्र या  अहवालात जागतिक उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर शिकागो पोर्ट ऑफ ट्रेड वर जानेवारी २०२२ चे वायदे, १२.१७ डॉलर प्रति बुशेल्स वर पोहचले आहेत. तर एनसीडीएक्स वर सौदे काहीसे वाढून ५४५४ रूपये झाले आहेत.

युएसडीएने अापल्या अहवालात म्हणटले आहे की, जागतिक पातळीवर २०२१-२२ च्या हंगामात अमेरिका आणि अर्जेंटिना या दोन देशात सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज असल्याने ११ लाख टनांनी कमी होऊन ३८४० लाख टन होण्याची शक्यता आहे. तर भारतात यंदा सोयाबीन उत्पादनात वाढ होणार असल्याचे अंदाजात म्हणटले आहे. 

अर्जेंटिना सोयाबीन लागवडीत घट होऊऩ उत्पादन तब्बल १५ लाख टनांनी घटणार आहे. भारताचा विचार करता सोपाच्या अहवालाने ११९ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज युएसडीएने वर्तवला आहे. तर जागतिक पातळीवरील सोयाबीनची निर्यात घटून ती १० लाख टनांनी कमी होऊन १७२१ लाख टनांवर येणार आहे. 

यंदा अमेरिका आणि अर्जेंटिनातील सोयाबीनचे उत्पादन घटणार असल्याने भारत आणि ब्राझील मधून निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. आयातीचा विचार करता चीनची आयात १० लाख टनांनी कमी होऊन ती १०० लाख टनांपर्यंत राहिल. तर जागतिक बाजारपेठेतील सोयाबीनचा साठा ८ लाख टनांनी घटून तो १ लाख ३८ हजार टनांवर येईल असा अंदाज आहे. तसेच अर्जेंटिना आणि चीनमधून साठा कमी राहून अमेरिकेतला साठा मात्र काहीसा वाढल्याचे या अहवालात म्हणटले आहे. 

  • अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन १५ लाख टनांनी घटणार
  • अमेरिकेतील उत्पादन २३० लाख बुशेल्सनी कमी
  • भारतात ११९ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा सोपाचा अंदाज
  • अमेरिका आणि अर्जेंटिनाची सोयाबीन निर्यात घटणार
  • भारत आणि ब्राझीलची सोयाबीन निर्यात वाढणार
  • चीनची आयात १० लाख टनानी घटणार
  • अमेरिकेतील हंगामातील सोयाबीन दर १२. १० डॉलर प्रति बुशेल्स राहतील असा अंदाज आहे.