Homeयोजना'या' कारणांमुळे पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास होत आहे...

‘या’ कारणांमुळे पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास होत आहे उशीर!

नवी दिल्ली | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा करण्याची औपचारिकता पूर्ण केली. यानंतर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्या कारणाने ही वेबसाईट सध्या कासवगतीने चालत आहे. बऱ्याचदा पेजच उपलब्ध नसल्याचेही दाखवले जात आहे. परंतु शेतकरी बंधूनी काळजी करण्याचे कारण नसून मोदींनी सांगितल्याप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना आश्वस्त केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे. परंतु सर्वरमधील तांत्रिक क्षमतेमुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, त्यांच्या खात्याचे स्टेटस् पाहिल्यास स्टेटसमध्ये  FTO is Generated and Payment confirmation is pending असं लिहलेलं दिसत आहे. याचा अर्थ, सरकारने तुम्ही दिलेली माहिती कन्फर्म केली असून लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. याचप्रमाणे जर Rft Signed by State Government असं स्टेटस दिसत असल्यास यातील RFT चा अर्थ Request For Transfer असा आहे. अर्थात तुम्ही दिलेली माहिती तपासण्यात आली असून ती पुढे पाठवण्यातआली आहे, लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments