Homeबातमी शेतीचीशेतकरी बंधूनो तुम्हीही मिळवू शकता दोन लाखापर्यंतचे पुरस्कार; लगेचच जाणून घ्या 'या'...

शेतकरी बंधूनो तुम्हीही मिळवू शकता दोन लाखापर्यंतचे पुरस्कार; लगेचच जाणून घ्या ‘या’ पुरस्कारांची माहिती

किसानवाणी : भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांची अवस्था मात्र बिकट होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नव्या जोमाने शेतीकडे वळावे, यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व शेती सुधारणेच्या दृष्टीने काम करणाऱ्या अनेक खासगी संस्था शेतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतात.

पूर्वी देशातील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून होती. परंतु कालांतराने ही संख्या ५० टक्क्यांवर आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षात असे दिसून आले आहे की सतत शेतीत होणारा तोटा यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार व शेतीच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या अनेक खासगी संस्था शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी पुरस्कार देतात.

उत्कृष्ट शेतीसाठी बळीराजांना ICAR देते पुरस्कार
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर- https://icar.org.in/ ) ही कृषी क्षेत्रासाठी काम करणारी एक प्रमुख संस्था आहे. शेतीशी संबंधित बहुतेक निर्णय, नवीन धोरणे, नवीन तंत्र आणि शेतीशी संबंधित नवनवीन उपक्रमांविषयी येथे निर्णय घेतले जातात. याशिवाय दरवर्षी शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकर्‍यांनाही ही संस्था प्रोत्साहित करते.

जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार / जगजीवन राम अभिनव शेतकरी पुरस्कार
शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढविणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर 3 पुरस्कार दिले जातात. एक लाख रुपये रोख रक्कम, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या बरोबरच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने संस्थेचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करावा म्हणून सम्मान रक्कमही दिली जाते.

एन. जी. रंगा शेतकरी पुरस्कार
शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी एन.जी. रंगा शेतकरी पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. या पुरस्कारांतर्गत शेतकऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रकाव्यतिरिक्त एक लाख रुपयांचे रोख बक्षीसही दिले जाते.

हलधर जैविक कृषी पुरस्कार
सेंद्रीय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकर्‍यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी हलधर सेंद्रीय शेतकरी पुरस्कार देण्यात येतो. यासह एक लाख रुपयेही दिले जातात पण हा पुरस्कार सेंद्रीय प्रामाणिकरण संस्थेचे प्रमाणपत्र असणार्‍या आणि सेंद्रीय शेतीचा 5 वर्षांचा अनुभव असणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योसदय कृषी पुरस्कार
पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योर्दयी कृषी पुरस्कार हे प्रत्येक वर्षाला अल्पभूधारक, लहान आणि भूमिहीन शेतकर्‍यांच्या योगदानास मान्यता देण्यासाठी दिले जातात. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रकाव्यतिरिक्त एक लाख रुपये देण्याची तरतूद या पुरस्कारात आहे. वर्षात तीन पुरस्कार देण्याचे प्रावधान या पुरस्कारात आहेत.

महिंद्रा समृद्धी भारत कृषी अवॉर्ड –
महिंद्रा ग्रुपच्या वतीने नेहमीच शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन प्रयोगासाठी दरवर्षी महिंद्रा समृद्धी भारत कृषी अवॉर्ड अंतर्गत राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर पुरस्कार देते. ज्यामध्ये कृषक सम्राट (पुरुष गट), कृषी प्रेरणा सन्मान (महिला), कृषी युवा सन्मान (युवा) देण्यात येतात या पुरस्कारांतर्गत राष्ट्रीय पातळीवर 2.11 लाख आणि क्षेत्रीय स्तरावर 51 हजारांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन देते शेतकऱ्यांना विविध पुरस्कार –
शेती क्षेत्राशी संबधित डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडीत पुरस्कार, कृषीभूषण (सेंद्रिय शेती) व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादि पुरस्कारांने प्रगतीशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते. पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’, कृषी शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ पुरस्कार नव्याने सुरु करण्यात येणार आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार – हा पुरस्कार राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. रु.75000 रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा सर्वोच्च पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्ती/गट/संस्थेस देण्यात येतो.
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार – हा पुरस्कार कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय आणि सहकार व ग्रामीण विकास या क्षेत्रात अती उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती/संस्थेस देण्यात येतो. रु.50000 रोख,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिजामाता कृषीभुषण पुरस्कार – कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे महिला शेतकरी यांना हा पुरस्कार देण्यात येतो. राज्यातून दरवर्षी 5 महिला शेतकरी यासाठी निवडण्यात येतात. रु. 50000 रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 
वसंतराव नाईक शेतिमीत्र पुरस्कार –  पत्रकारिते द्वारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषी क्षेत्रात विस्तार आणि मार्गदर्शनाबाबत बहुमोल कामगिरी करणारे शेतकरी/व्यक्ती/संस्था त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्त्यादी मधिल वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणारे व्यक्ती तसेच खेड्यांमधून परसबाग वृद्धींगत करणारे महिला इत्त्यादिंना हा पुरस्कार दिला जातो. रु.30000 रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
वसंतराव नाईक शेतिनीष्ठ शेतकरी पुरस्कार – शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवनवीन पद्धतीने पिक लागवड, इतर शेतकरी यांना मार्गदर्शन करणे, शासन/सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर इत्त्यादी निकषांतर्गत शेतकरी यांचे एकंदरीत कार्य विचारात घेउन सर्व साधारण आणि आदिवासी गटातील शेतकरी यांना हा पुरस्कार दिला जातो.  रु.11000 रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

                 

                        

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments