Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsचंद्रपूर जिल्ह्यातील 'या' शेतकऱ्याला करायची आहे गांजाची शेती; ग्रामपंचायत तपासणार कायदेशिर बाजू

चंद्रपूर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्याला करायची आहे गांजाची शेती; ग्रामपंचायत तपासणार कायदेशिर बाजू

किसानवाणी : कोराना तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचं आश्वासन दिलंय. पण ही मदत कधी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्विग्न झालेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सरकारकडे थेट गांज्याची शेती करण्यास परवानगी मागितली आहे. या शेतकऱ्याने ग्रामसभा, तहसीलदार यांना याबाबतचा रितसर अर्ज देखील दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्याच्या या मागणीची चर्चा सुरू आहे.

या शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी साईनाथ फुलमारे या नूकसानग्रस्त शेतकर्‍याने सरकारकडे अर्जाव्दारे ही विनंती केली आहे. त्याने आपल्या २ एकर शेतीत सतत नुकसान होत असल्याने गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी असे म्हणटले आहे. यासाठी या शेतकऱ्याने डोंगरगाव ग्रामसभेत यासाठी थेट अर्जच सादर केला आहे. गांजा शेती करु देण्याचा विनंती करणारा अर्ज त्याने शेतीच्या विपरीत परिस्थितीमूळे घेतला आहे. नुकतीच बुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील १ एकरावर हर्बल गांजा लावण्याची परवानगी मागितली होती.

जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन आणि धान शेती सडल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे. कुटुंब पालनपोषणासाठी शासनाकडून मदत मिळत नसल्याने गांजा शेतीची परवानगी त्याने मागितली आहे. तहसीलदार-कृषी विभाग आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याने हा विनंती अर्ज पाठविला आहे. ग्रामसभेने या अर्जासंदर्भात अर्ज स्वीकारत कायदेशीर बाजू तपासून प्रकरण निकाली काढू, अशी माहिती दिली आहे.

गांजाच्या शेतीला देशात बंदी

देशात गांजाच्या शेतीला बंदी आहे. अंमली पदार्थ आणि सामाजिक मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर गांजाच्या शेतीला देशात बंदी आहे. पण राज्यासह देशात बऱ्याचदा गांजाची शेती केल्याच्या बातम्या समोर येतात. गांजा प्रचंड किंमतीत विकला जातो. त्यामुळे गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तब्बल १५७ किलो गांजा तसेच तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments