Homeबातमी शेतीचीशेतकरी बंधूनो सोयाबीनचे भाव ठरवणारे 'हे' महत्वाचे तीन निकष तुम्हाला माहित आहेत...

शेतकरी बंधूनो सोयाबीनचे भाव ठरवणारे ‘हे’ महत्वाचे तीन निकष तुम्हाला माहित आहेत का?

किसानवाणी : प्रत्येक शेतकरी आपल्या शेतमालाला चांगला दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतात. सध्या बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून दर ४५०० ते ५५०० रूपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे फार नुकसान झाले. सुरुवातीला सोयाबीन ला चांगले बाजार भाव होते. परंतु अचानक बर्‍याच कारणांमुळे यामध्ये पडझड झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण आहे..

तसे पाहिले तर कोणत्याही शेतमालाचे बाजारभाव ठरवण्याचे प्रमुख तीन निकष असतात. यामध्ये पहिला निकष म्हणजेत आर्द्रता किंवा ओल त्यालाच मॉईश्चर असे म्हणटले जाते. दुसरे म्हणजे शेतमालात असलेले काडीकचरा, माती इत्यादी घटकांचे प्रमाण त्यालाच आपण फोरेन मॅटर असे म्हणतो आणि तिसरा घटक म्हणजे शेतमालावर असलेले डाग, पावसात भिजलेले सोयाबीनाला डॅमेज असे म्हणतात. या तीन प्रमुख गुणवत्ता निकषांच्या आधारे शेतमालाचे भाव ठरतात. तीनही घटकांची अधिक माहिती खालीलप्रमाणे..

सोयाबीनचेभावठरवणारेतीननिकष

  1. आर्द्रता किंवा ओल (मॉईश्चर)- स्टॅंडर्ड पद्धतीच्या मालामध्ये दहा टक्क्यांच्या पुढे आर्द्रता असेल तर एकास एक म्हणजे एका टक्क्यास एक किलो पद्धतीने घट पकडली  जाते. म्हणजे पंधरा टक्के मोईश्चर  असेल तर त्यातून दहा टक्के वजा जाता १०० किलो मागे पाच किलोची घट पकडली जाते. १५ ते १८ टक्के मध्ये एका टक्क्याला दोन किलो आणि अठरा च्या पुढे आर्द्रता असेल तर माल नाकारला जातो.
  2. माती, काडीकचरा इ. (फोरेन मॅटर)- प्रामुख्याने १०० किलो सोयाबीन मध्ये दोन टक्के काडीकचरा किंवा माती म्हणजेच फोरेन मॅटर हे सूट धरले जाते. हे प्रमाण दोन टक्क्यांच्या पुढे असेल तर आठ टक्क्यांपर्यंत एकास दोन किलो घट पकडली जाते. त्याचप्रमाणे हे प्रमाण आठ टक्क्याच्या पुढे असेल तर माल विकत घेण्यास नाकारला जातो.
  3. डागी, काळे पडलेले, पावसात भिजलेले (डॅमेज )- १०० किलो सोयाबीन मध्ये जर २ किलो डॅमेज सूट धरले जाते. परंतु गुणवत्ता तपासणाऱ्या डिवाइस मध्ये जर सात टक्क्यांपर्यंत डॅमेज आले तर तीन ते सात असे पाच टक्के मागे प्रत्येकी अर्धा किलो ची म्हणजे अडीच किलो घट पकडली जाते. जर डॅमेजचे प्रमाण सात टक्क्यांवर असेल तर प्रति टक्का पाऊन किलो ची घट पकडली जाते.

वरील निकषांचा विचार शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नेताना तो जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचा कसा नेता येईल हे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा शेतमालाला दर कमी मिळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments