‘फार्मर्स विमा पॅकेज पॉलिसी’ शेतकऱ्यांच्या फायद्याची; जाणून घ्या योजनेचे फायदे

किसानवाणी :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि., यांचे संयुक्‍त विद्यमाने फार्मर्स विमा पॅकेज पॉलिसी दिली जाते. त्‍यामध्‍ये दोन दुभती जनावरे, दूध उत्‍पादक शेतकरी (पती-पत्‍नी), राहते घर, वासरु संगोपन योजने अंतर्गत असणारी दोन वासरे व बायोगॅस यांना विमा सुरक्षा दिली जाते.

  • टीप : ही विमा योजना दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि. यांची असून महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी स्वतः देखील या योजनेत सहभाग घेऊ शकतात. वैयक्तिकरित्या शेतकरी या योजनेत सहभागी झाल्यास हप्त्याची सर्व रक्कम शेतकऱ्यास भरावी लागेल. दूध संघ आणि दूध संस्थेकडून विमा हप्त्यापोटी केली जाणारी मदत मिळणार नाही.

दि न्‍यू इन्डिया एश्‍योरन्‍स कंपनीमार्फत देणेत येणारी किसान विमा पॉलिसी ही दोन प्रकारे दिली जाते. त्‍यातील रुपये ७७० इतक्‍या किंमतीस दिल्‍या जाणाऱ्या पॉलिसीमध्‍ये रुपये ४६२ हे दूध उत्‍पादकांनी भरावयाचे असून त्‍यात समान दहा हप्‍ते करुन दूध बिलातून घेणेची सवलत दिली आहे. उर्वरीत रक्‍कम रुपये १५४ दूध संस्‍थेमार्फत व रुपये १५४ हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जातात तर दुसरी पॉलिसी रुपये १६०० इतक्‍या किंमतीस दिली जाते. त्‍यापैकी  रुपये ९६० हे दूध उत्‍पादकांनी भरावयाचे असून त्‍यातही समान दहा हप्‍ते केले आहेत. उर्वरीत रक्‍कम रुपये ३२० दूध संस्‍थेमार्फत व रुपये ३२० हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जात असून पॉलिसी अंतर्गत दोन दुभत्‍या जनावरांकरीता ७७० रुपयांच्‍या पॉलिसी करीता २० हजार रुपये तर १६०० रुपयाच्‍या पॉलिसीकरीता ४० हजार रुपये, पती-पत्‍नीस अपघाती विमा कवच १ लाख रुपये,  राहत्‍या घरास १ लाख रुपये, दोन वासरांकरीता प्रत्‍येकी रुपये ५ हजार व गोबर गॅसकरीता रुपये २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

https://www.newindia.co.in/portal/product/know-more/rural-insurance/cattle-insurance

सध्‍या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे सर्वञ लॉकडाऊन असतानासुध्‍दा माहे एप्रिल २०२० पासून आजअखेर ६० लाख रुपयांची नुकसान भरपाई या पॉलिसी अंतर्गत देण्‍याचे काम गोकुळ दूध संघ व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीने केले आहे.