Homeतंत्रज्ञानशेतकरी बंधूनो सरकारकडून 6000 रूपये मिळवण्यासाठी डाऊनलोड करा 'हे' मोबाईल अ‍ॅप

शेतकरी बंधूनो सरकारकडून 6000 रूपये मिळवण्यासाठी डाऊनलोड करा ‘हे’ मोबाईल अ‍ॅप

किसानवाणी : केंद्र सरकार शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहे. केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या PM Kisan सन्मान निधी योजनेमध्ये सुलभता आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात येणाऱ्या हप्त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आता खास अ‍ॅन्ड्राॅईड अ‍ॅप्लिकेशन उफलब्ध करून दिले आहे.

या अ‍ॅप्लिकेशनव्दारे शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरून नोंदणी देखील करता येणार आहे. त्याचबरोबर आधार फेल्युअर रेकॉर्ड, बेनिफिशअरी स्टेटस, नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती अशा विविध बाबींची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन PM Kisan GoI Mobile Kisan App डाऊनलोड करावे लागेल.

अ‍ॅप मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर आधार नंबर नोंदवा आणि आपल्या राज्याचे नाव निवडा. यानंतर इमेज कोड (कॅप्चा कोड) टाका. माहिती भरण्यासाठी नाव, पत्ता, बँक अकाऊंट डिटेल, IFSC कोड एंटर करा. यानंतर जमिनीची माहिती, जसे की, सर्व्हे नंबर इत्यादी भरा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर तुमचे मोबाइल रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. याशिवाय शेतकरी कोणत्याही चौकशीसाठी पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261/011-24300606 चा वापर करू शकतात.

PM Kisan GoI Mobile App द्वारे रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. यामध्ये तुम्ही कधीही रजिस्ट्रेशन आणि पेमेंटची स्थिती जाणून घेवू शकता. आधार नंबर अंतर्गत नावात सुधारणा करू शकता. योजनेबाबत जाणून घेवू शकता. सोबत हेल्पलाईन नंबर डायल करू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईसाठी आणि पीम किसानचा लाभ घेण्यासाठी हे अ‍ॅप जरूर डाऊनलोड करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments