Homeपशुसंवर्धनमहाराष्ट्रात १२ लिटर दूध देणारी शेळीची जात? शेळी संवर्धनावर राज्य सरकारचा भर

महाराष्ट्रात १२ लिटर दूध देणारी शेळीची जात? शेळी संवर्धनावर राज्य सरकारचा भर

किसानवाणी :
शेळीला गरीबाची गाय म्हणतात. आता हीच गरिबाची गाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरघोस दूध उत्पादन देण्यासाठी सज्ज होणार आहे. भारतातील गीर गाईचा गोवंश ज्याप्रमाणे वाढवून ब्राझीलने धवल क्रांती केली त्याच धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून तिच्यावर संशोधन करण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात  दिली.

दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनावर भर देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. कॅनडामध्ये सानेन शेळीची जात विकसीत करण्यात आली आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही शेळी फायद्याची ठरणार आहे.  

रोममधील जागतिक अन्न आणि शेती संस्थेच्या अहवालानुसार जगातील ४९ टक्के लोक शेळीचे दूध पितात. शेळीचे दूध औषधी आहे.  त्यातच सानेन या जातीची शेळी जर घेतली, तर गावठी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या अधिक दूध देतात. २६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२०० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे,

शेळीची चारा-पाण्याची गरज ही गाईच्या तुलनेत एक पंचमांश एवढी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे गाईंचा गोठा असेल, तर गाईंच्या उरलेल्या चाऱ्यावरही शेळीपालन सहज शक्य आहे. त्यासाठी वेगळा पगारी माणूस ठेवण्याची गरज नाही. शिवाय अधिक जागा लागत नाही. शेळी प्रकृतीने काटक असल्याने कोणत्याही हवामानात राहू शकते. रोगराईचे प्रमाण कमी आहे. शिवाय ही शेळी खुराकाचे जास्तीत जास्त दुधात रूपांतर करते.

शेळीचा गाभण काळ फक्त पाच महिन्यांचा असतो. शेळीपासून एका वेतात कधी दोन, तर कधी तीन करडे  मिळतात. इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. तसेच या जातीच्या बोकडांच्या मांसाची मागणीही अधिक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments