शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; खतांच्या किंमतीत मोठी घट

किसानवाणी :
इफ्कोने देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून कंपनीने 20: 20: 0: 13 एनपी खताच्या किंमतीत ५० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता या खताची किंमत (अमोनियम फॉस्फेट सल्फेट) ९७५ रुपयांवरून ९२५ रुपयांवर आली आहे. एनपी खताच्या किंतीत घट झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पादनात भर पडेल असे कंपनीचे म्हणणे आहे. नवीन किंमती तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत.

इफ्कोने काही दिवसांपूर्वी जाहीरे केले होते की, सध्या कोणत्याही खतांच्या दरात वाढ केली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इफ्कोने नुकतेच गंधक प्रति टन प्रती एक हजार रुपयांनी कपात केली आहे. त्याचबरोबर कंपनीने काही महिन्यांपूर्वी एनपीके आणि डीएपी खताच्या दरात देखील कपात केली होती. इफ्को मुख्यत: यूरिया, डीएपी, एनपीके, एनपी, वॉटर विद्राव्य, सागरिका आणि जैव खत तयार करते.

एनपी खत – एनपी खातामध्ये गंधक असते, ते तेलबिया पिकांसाठी शेतकरी वापरतात. तेलबिया पिकांच्या पोषण आहारासाठी अमोनियम फॉस्फेट सल्फेट खत खूप महत्वाचे आहे. तीळ, मोहरी, भुईमूग, सोया आणि सूर्यफूल ही तेलबिया पिके केवळ तेलासाठीच उत्पादित केली जातात. चालू वर्षामध्ये ११.५ दशलक्ष टन मोहरीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. असे असूनही, खाद्यतेलांच्या बाबतीत आयातीवर अवलंबून असण्याचे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. देशांतर्गत मागणी भागविण्यासाठी दरवर्षी सुमारे १४ ते १५ दशलक्ष टन खाद्य तेले आयात केली जातात.