Homeयोजनापीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

किसानवाणी : पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याची प्रतिक्षा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना लागलेली होती. मात्र शेतकऱ्यांची ही प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारांकडून RFT Sign करण्यात आले होते FTO (FTO is generated and Payment confirmation is pending) देखील जनरेट करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात मे महिन्याच्या कोणत्या तारखेला किती वाजता पैसे जमा होणार याची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.. PM किसान सन्मान निधी : ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आठव्या हप्त्याचे पैसे

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या अकाऊंट डिटेल्समध्ये FTO is generated and Payment confirmation is pending 8th Installment किंवा ज्या शेतकऱ्यांचा जो हप्ता असेल त्यानुसार अपडेट दाखवत आहे. FTO चा अर्थ फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या वैयक्तिक खात्याची माहिती पडताळून घ्यावी. 

यासाठी शेतकऱ्यांनी पहिल्यांदा https://pmkisan.gov.in या ठिकाणी जाऊन Farmers Corner वर क्लिक करावे. या ठिकाणी  ‘लाभार्थी स्थिती’ अर्थात ‘Beneficiary Status’ या ऑप्शनवर क्लिक करावे. येथे नवीन पृष्ठ उघडल्यानंतर तेथे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यापैकी एक पर्याय वापरून आपल्या खात्यात प्रवेश करावा. याठिकाणी आपल्या खात्याची अद्ययावत माहिती स्क्रिनवर उपलब्ध होईल. 

पीएम किसान योजनेचा चालू आर्थिक वर्षातील हप्ता एप्रिल ते जुलै च्या दरम्यान देणे सरकारला बंधनकारक आहे. एप्रिल महिन्यात देशातील काही राज्यांमध्ये असलेली निवडणुकांची धामधुमी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता निवडणुकांची धामधूम संपली असून केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यास वेळ मिळणार आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments