Homeयोजनामहाराष्ट्र सरकार सुरू करत आहे ‘महापशुधन संजीवनी योजना’; जाणून घ्या काय आहे...

महाराष्ट्र सरकार सुरू करत आहे ‘महापशुधन संजीवनी योजना’; जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना

किसानवाणी :
महाराष्ट्र सरकार पशुपालकांना जनावरांवरील उपचाराची सुविधा आता घरीच उपलब्ध करून देणार आहे. यासाठी महाराष्‍ट्र सरकारने ‘भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड’ सोबत करार केला आहे. ही कंपनी इंडसइंड बँकेची सहाय्यक कंपनी आहे. करारानुसार शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी उपचाराची सुविधा घरीच उपलब्ध होणार आहे. बँकेने यासंबंधी माहिती देताना म्हटले की या योजनेचे नाव ‘महापशुधन संजीवनी योजना’ असे आहे. या योजनेद्वारे पशुधनाच्या चिकित्सा सेवेसाठी शेतकऱ्यांना एका फोन कॉलवर सहाय्यता केली जाणार आहे.

‘महापशुधन संजीवनी योजने’चा लाभ घेण्यासाठीशेतकऱ्यांना १९६२ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून हा नंबर जानेवारी २०२१ पासून कार्यान्वित होणार आहे. ‘भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड’ कंपनीने,महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्य सरकार आणि इंडसइंड बँक चे अधिकारी यांच्या उपस्थितीत कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या रूपात महापशुधन संजीवनी योजनेला मदत करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये असलेल्या ३१ जिल्ह्यांमधील ८१ तालुक्यांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. या सगळ्या परिसरात पशुधनाची एकूण संख्या १.९६ कोटी इतकी आहे. या योजनेद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना पशुचिकित्सेसाठी अंतर्भूत केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जनावरांचा उपचार, लसीकरण, कृत्रिम गर्भधारणा, तसेच त्यांची देखभाल आणि पशुपालना संबंधित सव प्रकारची माहिती दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments