Homeबातमी शेतीचीऊसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

ऊसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

किसानवाणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ऊसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीमध्ये उसाच्या एफआरपी मध्ये पाच रुपये प्रति क्‍विंटल वाढ करण्याविषयीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. यामुळे ऊसाच्या खरेदी मूल्यात वाढ होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर दिली आहे. एफआरपी वाढल्याने साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याचा साखर कारखान्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर उसावरील वाजवी आणि मोबदला देणारी किंमत (FRP) 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढलीय. गेल्या वर्षी एफआरपीमध्ये 10 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता उसाची एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटल झाली आहे.

हवामान अंदाज, व आपल्या शेतातील प्रत्येक पिकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा #BharatAgriApp

पीयूष गोयल यांनी सांगितलय की, साखरेची एफआरपी 290 प्रति क्विंटल आहे, जी 10 टक्के वसुलीवर आधारित असेल. 70 लाख टन साखरेची निर्यात होणार आहे. त्यापैकी 55 लाख टन निर्यात झाली आहे. सध्या 7.5 टक्के ते 8 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे. पुढील काही वर्षांत हे मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत होणार आहे. सरकारच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. उसाची एफआरपी किंमत 290 रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा 87% परतावा मिळेल. इथेनॉल उत्पादन, साखर निर्यातीला प्रोत्साहन, साखर उद्योगाला बफर स्टॉकद्वारे पैसे देणे, अशा निर्णयांनी ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळून त्यांना मोठा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments