Homeहवामान'गुलाब' चक्रीवादळ आता कुठे आहे Live पहा; वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वाढली

‘गुलाब’ चक्रीवादळ आता कुठे आहे Live पहा; वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वाढली

गुलाब चक्रीवादळ LIVE (👈 क्लिक करून पहा Live Cyclone)

किसानवाणी : पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता ‘गुलाबी’ नावाच्या चक्रीवादळात (Gulabi cyclone) झाले आहे. हे वादळ आज अरबी समुद्रात धडकणार आहे. त्यामुळे 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान कोकणासह राज्यातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्ट्याचे ‘गुलाबी’ चक्रीवादळात रूपांतर झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे.

गुलाबी चक्रीवादळ रात्री उशिरापर्यंत ओडिशा- आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पोहोचणार आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 26 सप्टेंबरपासून दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच मुंबईसहित कोकणातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जून महिन्यात मान्सूनने दिमाखात आगमन केल्यानंतर, राज्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. पण यंदा परतीच्या पावसाचा काहीसा उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 8 ऑक्टोबरपासून राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही उशीरा परतीचा पाऊस दाखल होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments