Saturday, January 28, 2023
HomeAgriculture News#सोयाबीन नंतर आता #एकरकमी_FRP ट्रेंड व्हायरल; जाणून घ्या काय आहे यामागची पार्श्वभूमी..!

#सोयाबीन नंतर आता #एकरकमी_FRP ट्रेंड व्हायरल; जाणून घ्या काय आहे यामागची पार्श्वभूमी..!

किसानवाणी : सोशल मिडीयावर अनेक #ट्रेंड व्हायरल होत असतात. यापूर्वी हे ट्रेंड फारसे शेतकरी वर्गासाठी नसायचे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात #ट्रेंड व्हायरल होऊ लागलेत. #सोयाबीन नंतर आता #एकरकमी_FRP हे ट्रेंड सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र या #ट्रेंड मध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाची व्यापक पार्श्वभूमी आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणाऱ्या बाजारभावामुळे शेतकरी वर्गात मोठा असंतोष आहे. शिकलेले, टेक्निकल नॉलेज घेतलेले बहुसंख्य युवक शेती करत आहेत. जवळपास प्रत्येक क्षेत्राचे डोमेन नॉलेज असलेल्या नव्या पिढीचे हे लोक शेतीत आहेत. त्यामुळेच ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत आहेत. शेतकरी मुलांनी विचारलेले हे प्रश्न लॉजिकल आहेत, परंतु त्याबाबत तेवढचं लॉजिकल उत्तर केंद्र सरकार अथवा राज्य सरकार या दोघांकडेही नाही.

MSP किंवा FRP च्या अंमलबजावणीतील खोट तसेच पिकविम्यातील चोरीमुळे राजकर्त्यांची विश्वासार्हता जवळपास संपली आहे. बॅंकांकडून अपुरे कर्ज वितरण होत असल्याने अवैध सावकारीचा सुळसुळाट झालाय. निर्यातीबंदी, बॉर्डरबंदी, स्टॉकबंदी, वायदेबंदीने धान्य उत्पादक, फलोत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. जमिनीच्या तुकड्यापेक्षा कर्ज जादा झाल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहेत. त्यातच वीजपुरवठा तोडून पिकं जाळण्याचे प्रकार घडल्याने असंतोष आणखीनच वाढत आहे.

अनिर्बंध आयाती, MSP च्या खाली भाव असतानाही परदेशांशी तूर उत्पादनाचे करार यामुळे, हे सरकार नेमके कुणाचे? असे प्रश्न विचारले जात आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे वाताहत झालेल्या डेअरी, पोल्ट्रीधारकांना अपेक्षित पॅकेजेस, मदत मिळाली नाही. देशातील गोदामांमध्ये धान्य सडत असतानाही डेअरी व पोल्ट्री उद्योगाकडून अनुदानित दरात पुरवठा करण्याच्या मागणीची दखलही घेतली गेली नाही. महाराष्ट्रात कडधान्ये, तेलबिया, फलोत्पादन, डेअरी-पोल्ट्री, ऊस-कपाशी आदी पिकातील शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्यात राज्यकर्ते साफ अपयशी ठरलेत. राज्यकर्त्यांची वैयक्तिक प्रगती होतेय, पण आम्ही गाळात जातोय, ही भावना या शिकलेल्या शेतकरी मुलांमध्ये बळावत चालली आहे.

या पार्श्वभुमीमुळेच सोशल मीडियावर सोयाबीन ट्रेंड काही तासात सर्वदूर पोचला. तसाच आता एफआरपीचे तुकडे करण्याच्या सरकारच्या धोरणाला विरोध म्हणून #एकरकमी_FRP हा ट्रेंड जोर धरत आहे. या व्हायरल ट्रेंडमध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाची व्यापक पार्श्वभूमी आहे.

संदर्भ – दीपक चव्हाण (कृषि अभ्यासक), यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments