किसानवाणी :
पीएम किसान योजनेत धनाड्य शेतकरी, आयकर दाते शेतकरी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर अशा अनेकांनी लाभ उकल्याचे समोर आले आहे. अशा आयकरदात्यांकडून पीएम किसान योजनेचे पैसे वसूल करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर तहसिलदारांमार्फत अपात्र परंतु लाभ उकळलेल्यांना वसुली संदर्भातील नोटिसा पाठवणे सुरू केले आहे.
नोटीसीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयीन पत्रान्वये… प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत Income Tax धारक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला लाभ वसूल करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच नोटीशीत उल्लेख केलेली रक्कम रोख, धनादेश स्वरूपात तहसिलदार यांच्या खात्यात नोटीस बजावलेल्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत भरण्याचे आदेश दिले आहेत.
सदर रक्कम ७ दिवसात जमा केली नाही तर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही नोटीसीत म्हणटले आहे, तसेच गावकामगार तलाठी यांना सदर नोटीस सदर लाभार्थीस तामील करून जमा रक्कमेची पावती तहसिल कार्यालयास सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.