Saturday, January 28, 2023
HomeCrop Waterलाखो रूपये मिळवून देणारी केशर शेती कशी करायची? वाचा सविस्तर...

लाखो रूपये मिळवून देणारी केशर शेती कशी करायची? वाचा सविस्तर…

  • महत्वाचे : मागील दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात केशर शेतीच्या नावाखाली चक्क करडईची लागवड केली जात होती. अमेरिकन केशर अशी विविध नावे देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे कामही यामाध्यमातून सुरू होते. त्यामुळे अशा भुलथापांना बळी पडून नका.
  • सध्या केसर शेतीबद्दल अनेकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्वांसाठी आज आम्ही ही माहिती उपलब्ध करून देत आहोत.

किसानवाणी :
काश्मीरचं सोनं म्हणून ओळख असणारे केशर देशभरातील विविध ठिकाणी पिकवण्याचे प्रयोग सुरू आहेत. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत देखील २०१७ पासून अशा प्रकारचे प्रयोग सी. के. जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. तसं पाहिलं तर खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशरची ओळख आहे. मुळात केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकससॅटायव्हस आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण मध्य आशियातील असून फ्रान्स, स्पेन, इटली, भारत, चीन, इराण, पाकिस्तान इ. देशामध्ये याची लागवड केली जाते.

भारतातील जम्मू आणि काश्मीर येथे (समुद्रसपाटीपासून सु. १,६०० मी. उंचीवर) केशराची लागवड करतात. या वनस्पतीच्या फुलांतील जायांगाच्या टोकाकडील धाग्यासारखा भाग (कुक्षी – येथे परागकण येऊन पडतात) वाळवून केशर मिळवितात. केशर हे लहान व बहुवर्षायू फुलझाड असून त्याला जमिनीत खवलेयुक्त घनकंद असतो. त्यापासून जमिनीवर रेखाकृती, निमुळती होत जाणारी, गवतासारखी बारीक पाने येतात. फुले जांभळी, एकेकटी व पानांसारखी भासणारी असतात. त्यात पिवळे परागकोश असतात. अंडाशय तीन कप्प्यांचे असून कुक्षी केशरी रंगाची असते. कुक्षीचे भाग २.५ सेंमी. लांबीच्या देठाने वनस्पतीशी जोडलेले असतात. हेच केशराचे तंतू असून ते वाळवून केशर मिळवले जाते. 

केसर बियाणे येथे उपलब्ध..

केशर मिळविण्यासाठी फुलातील कुक्षीची टोके अगदी सकाळी खुडतात व ती उष्णतेने किवा उन्हात वाळवितात. सुमारे ४०,००० फुलांपासून अर्धा किग्रॅ. केशर मिळते, यामुळे ते महाग असते. वाळवलेल्या केशराचा दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात टाकतात. तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे, तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानले जाते. असे तरगंणारे केशर पुन्हा वाळवून झोडतात आणि त्याचा दर्जा ठरविण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात. सध्या ऑनलाईन मार्केटमुळे विक्रीची चांगली सोयही उपलब्ध झाली आहे.

भारतातील केशराचे शाही केशर, मोग्रा केशर आणि लांचा केशर असे तीन प्रकार आहेत. शाही केशर उच्च प्रतीचे असते, तर लांचा केशर हे हलक्या प्रतीचे असते. केशराचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने त्याला अधिक महत्व आहे. केशर सुवासिक, उत्तेजक, शक्तिवर्धक, मूत्रल आणि रेचक असते. केशर श्वसननलिकादाह, घशाचे विकार आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी असते, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. खरचटणे, साध्या जखमा, संधिवात इत्यादींवर केशराचा लेप लावतात. केशराचा प्रमुख उपयोग मिठाई व इतर खाद्यपदार्थांना स्वाद आणि रंग आणण्यास करतात. लोणी, चीज, केक, श्रीखंड, बासुंदी, लाडू, खीर, मसाला दूध, बिर्याणी अशा विविध खाद्यपदार्थांत केशर मिसळतात. केशर सुवासिक असले, तरी चवीला कडू असते. केशरात असलेल्या क्रोक्रेरीन या घटकामुळे खाद्यपदार्थांना रंग, तर पिक्रोक्रॉसीन आणि सॅफ्रॅनल या घटकांमुळे चव आणि गंध प्राप्‍त होतो.

तोळ्याच्या मापात विकले जाणारे केशर प्रतिकिलो २.५ ते ३ लाख रूपये दराने विकले जाते. त्यामुळे सर्वाधिक दर मिळणारे केशर हे मसाल्यातील सर्वाधिक महागडे पीक आहे. केशरच्या लागवडीसाठी १० वॉल्व बीयांचा किंवा कंदाचा उपयोग केला जातो. केशरची लागवड समुद्र सपाटीपासून ते १५०० ते २५०० मीटर उंचावर केली जाते. काश्मीर मध्ये देखील याच उंचीवर ही लागवड होत असते. केशर शेतीसाठी थोडेफार ऊन आणि शुष्क कोरडी थंडी (१० अंश सेल्सिअसपर्यंत) आवश्यक असते. 

केसरच्या उत्पादनासाठी जमीन निवडताना ती रेतीदायक, वालुकामय नाही तर चिकणमातीयुक्त असलेली असावी. असे असले तरी पाण्याचा निचरा होणे अत्यंत आवश्यक असून एकाच ठिकाणी पाणी जास्त वेळ जमा राहिल्यास केसरचे कंद खराब होऊन जातात आणि पिक खराब होते. त्यामुळे जमीन निवडताना ती पाणी साचून राहणार नाही अशीच निवडणे गरजेचे आहे. केशरचे बियाणे लावण्या अगोदर शेतीची चांगल्याप्रकारे नांगरट करावी. यानंतर रोटरने माती भुसभुशीत करून त्यात एकरी २० टन शेणखत मिसळून घ्यावे. सोबत ९० किलोग्रॅम नाइट्रोजन, ६० किलोग्रॅम फॉस्फरस आणि पोटॅश प्रति हेक्टर प्रमाणे शेतात टाकावे. यामुळे केशरचे पिक चांगल्या प्रकारे येईल.

केशरची लागवड भौगोलिक वातावरणानुसार करावी लागते. उंच पहाडी भागात केशरची लागवड जुलै ते ऑगस्ट दरम्यान केली जाते. जुलैच्या मध्यावतीतील लागवड अधिक चांगली ठरते. मैदानी क्षेत्रात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केली जाते. केशरचे बल्ब लावताना ६-७ सेंमी चा खड्डा करावा आणि दोन कंद त्यात टाकावे. त्यानंतर १० सेंमीच्या अंतरावर दुसरा खड्डा करावा. यामुळे कंद चांगल्या पध्दतीने पसरतात आणि उत्पादन चांगले येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments