Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsपंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

पंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

किसानवाणी :
राज्यात सध्या पावसाचा कहर सूरू असून शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त होऊ लागली आहेत. खरीपातील अनेक पीके काढणीच्या अवस्थेत आहेत. तर काहींची काढणी सुरु आहे. मात्र अशा सर्व पिकांचे या पावसाने मोठे नुकसान केले आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतून पीकांचा विमा उतरवला आहे, त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासात नुकसानीबाबतची माहिती क्रॉप इन्शुरन्स अॅप अथवा टोल फ्री क्रमांकाव्दारे विमा कंपनी, संबधित बॅंक किंवा कृषि विभागास देणे आवश्यक आहे. 

पीक नुकसानीचा पुरावा म्हणून क्रॉप इन्शुरन्स ॲप या मोबाईल ॲपव्दारे नुकसानग्रस्त क्षेत्राचे छायाचित्रे विमा कंपनीस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2020 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी रिलायंन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि ची नियुक्ती करण्यात आली असून टोल फ्री क्रमांक  18001024088 आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अवघ्या २७६३ जणांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा योजनेतून नुकसानभरपाईचा लाभ घेता येणार आहे. सध्या पावसामुळे जमीनदोस्त होत असलेल्या पिकांचे नुकसान पाहिल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबतीत पुन्हा गांभिर्याने विचार करून आपला सहभाग वाढवणे गरजेचे आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत, हंगाम कालावधीत अधिसुचित क्षेत्रातील पीक, पीक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेले पीक (अधिसुचित पिकांसाठीच कापणी पासून जास्तीत जास्त १४ दिवस गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसानभरपाईस पात्र आहे. अधिसुचित विमा क्षेत्रात अधिसुचित पीक घेणाऱ्या व पूर्वसुचना दिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही तरतुद वैयक्तिक स्तरावर लागू राहील. जास्तीत-जास्त दायित्व हे अधिसुचित पिकाच्या बाधित क्षेत्राच्या विमा संरक्षित रक्कमेएवढे राहील. या बाबींअंतर्गत जोखिमीचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित रकमेच्या अधिन राहील.

नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे – 

  • नुकसान भरपाईबाबत पूर्वसुचना मोबाईल ॲपव्दारे कळविली नसल्यास शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह (शेतकऱ्याचे नाव, बाधित सर्व्हे नं. व पिकनिहाय बाधित क्षेत्र, पोर्टलवरील शेतकरी अर्ज क्रमांक, मोबाईल नं., KCC A/c No. शेतकऱ्यांसाठी), बचत खाते नं. (बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी), विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ. विमा कंपनीस विहित कालावधीत सादर करणे आवश्यक. 
  • शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो. परंतु, अर्जातील उर्वरित माहिती ७ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments