मेघगर्जनेसह पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता – IMD

किसानवाणी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. राज्यातील कोकण, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सुरू आहे. परंतु आता पुन्हा एकदा येत्या 24 तासात या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दिनांक १ डिसेंबर ते ७ डिसेंबरचा संपूर्ण हवामान अंदाज वाचण्यासाठी क्लिक करा – IMD WEATHER

लक्षदीप मालदीव जवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने द्रोनीय भागामुळे आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यासोबतच मुंबईसह राज्यातील इतर भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील दोन-तीन दिवसांपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदेव व लक्षद्वीप व चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व व मध्य अरबी समुद्रात द्रोनीयस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव  व लक्षदीप मध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्याच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर,नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक,अहमदनगर,धुळे, नंदुरबार,जळगाव, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात या किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढला आहे. हा संपूर्ण परिसर ढगांनी वेढला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. यामुळे राज्यात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आगामी चोवीस तासांत मध्यम स्वरूपाचे राहील. पुढील 48 तासांत ते अधिक तीव्र होऊन शनिवारपर्यंत देशभर पाऊस राहील. अरबी समुद्रातही वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कोकण ते गुजरात किनारपट्टीपर्यंत ढगांची प्रचंड गर्दी झाली आहे. वार्‍यांचा वेगही वाढल्याने सर्वत्र दाट धुके व हलका पाऊस राहील.