किड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..!

किसानवाणी | निसर्गामध्ये काही कीटक शेतकऱ्यांचे मित्र तर काही शत्रु असतात. या शत्रू किडी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने उत्पादनात घट येते. परिणामी शेतकऱ्यांला मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शत्रु कीटकांच्या म्हणजेच किडींच्या व्यवस्थापनासाठी पर्यावरणाचा समतोल राखून त्यांचे नियंत्रण करणे गरजेचे असते. या किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवून कमी खर्चात त्यांचे नियंत्रण करण्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणटले जाते…

पिकांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर सर्वात प्रभावी आणि कमीत कमी खर्चाचा ठरतो. यामुळे किडींचे नियंत्रण तर होतेच शिवाय किडींमुळे होणारे नुकसान टळल्याने पिक उत्पादनातही वाढ होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करण्याआधी ही पध्दत नेमकी कशी काम करते, कामगंध सापळ्यांचे विविध प्रकार आणि वेगवेगळ्या पिकांनुसार वापरायचे कामगंध सापळे याबाबतची सविस्तर माहिती या व्हीडीओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत… चला तर पाहूया..