Homeतंत्रज्ञानराज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय : कृषिमंत्री दादा भुसे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय : कृषिमंत्री दादा भुसे

किसानवाणी :
दिवसेंदिवस शेती क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून ही बाब ध्यानात घेत राज्याचा कृषि विभाग देखील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम करू लागला आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर व्हाटसॲप आणि ब्लॉगच्या माध्यमातून प्राप्त करता येणार आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबींचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हॉटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे. मातीत राबविणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’  शब्द टाईप करून पाठविल्यास त्यांना स्वागत संदेश प्राप्त होईल. या संदेशात कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले जातील. त्या आपल्याला हव्या असलेल्या पर्यायाचा कि वर्ड टाईप करून पुन्हा व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळेल.

सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास २७ योजनांचा समावेश आहे. यामध्ये कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश केला असून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉगही तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments