Homeयोजनामहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी

किसानवाणी :
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची अद्याप कर्जमुक्ती झालेली नाही अशा पात्र लाभार्थ्यांना तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडून करण्यात आले आहे. 

  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आली होती. परंतु या संदर्भात अद्याप पुढील निर्णय झालेला नाही.

यासंदर्भात दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत व्याजासह दोन लाखापर्यंत थकित कर्जाची रक्कम संबधीत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत यापूर्वी विशिष्ट क्रमांकासह कर्ज खाती सहा याद्या आधार प्रमाणीकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झालेल्या आहेत. तसेच 1 जानेवारी 2021 रोजी विशिष्ट क्रमांकासह सातवी यादी आधार प्रमाणीकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झालेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची प्राप्त झालेली नविन यादी बँकेत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व जिल्ह्यातील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले संबधीत बँकेशी संपर्क साधुन आपले नाव सातव्या यादीमध्ये आलेले असल्यास जवळच्या सी.एस.सी. किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.

आधार प्रमाणिकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उपसहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments