Homeयोजनापीएम किसान : जिल्हा बॅंकांमध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपये पडून

पीएम किसान : जिल्हा बॅंकांमध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपये पडून

किसानवाणी :
पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने देशातील शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच देशभर कृषि विधेयकावरून शेतकरी वर्गाचे आंदोलन सुरू असल्याने देखील शेतकरी मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.

पीएम किसान योजनेत सुरू असलेल्या घोटाळ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा सहावा हप्ता देखील मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ४ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत पडून आहेत. एकीकडे शेतकरी पीएम किसानचा हप्ता मिळावा म्हणून चकरा मारत आहेत, तर दुसरीकडे महसूल खाते, बॅंकेतील अधिकारी आणि ऑपरेटर लोकांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित रहावे लागत आहे. संपूर्ण देशभरात अशीच स्थिती असून ऑपरेटर्स, महसूल विभाग आणि बॅंकामधील लोकांच्या चुकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पीएम किसान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. 

  • पीएम किसान चे पैसे मिळत नसल्यास याठिकाणी तपासा तुमचे नाव – PM Kisan List
  • योजनेचा सातवा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना १० डिसेंबर नंतर मिळण्यास सुरवात होणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सुरवातीपासून ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या हप्त्यानुसार आणि त्याचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट झाली आहे. एकीकडे पात्रता नसणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतील सावळ्या गोंधळामुळे लाभ मिळालाय, तर दुसरीकडे जे खरोखर पात्र आहेत त्यांच्याबाबतीत तांत्रिक चुका निर्माण करून त्यांना लाभापासून वंचित ठेवल्याचे एकंदरित आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांशी जिल्हा बॅंका आणि इतर बॅंकांमध्ये शेतकऱ्यांचे आलेले पैसे तसेच पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 

त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यात काटेकोरपणे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा योजना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणीच्या बाबतीत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळामुळे काही दिवसांनी ही योजना केवळ कागदोपत्रीच राबवली गेल्याचे दिसल्यास नवल वाटणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments