Saturday, February 4, 2023
HomeAgriculture Newsतूर उत्पादकांसाठी महत्वाचा अलर्ट; अन्यथा नंतर...

तूर उत्पादकांसाठी महत्वाचा अलर्ट; अन्यथा नंतर…

किसानवाणी | महासीड्स फार्मर्स कंपनीचे संचालक विठ्ठलराव पिसाळ कळवतात, की तूर उत्पादनाचे अनुमान राज्याने केंद्राला वेळेवर सादर करावे आणि MSP खरेदी प्रस्ताव द्यावा. म्हणून याबाबत स्थानिक आमदार व खासदारांकडे सुद्धा पाठपुरावा करावा. राज्याअंतर्गत उत्पादनाच्या 25% भाग MSP योजनेत खरेदी होतो.

वेळेवर पाऊस पडल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात तुरीची पेरणी झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आवक सुरू होईल. तर डिसेंबरमध्ये उच्चांकी आवक राहील. म्हणून खरेदी केंद्र हे नोव्हेंबरमध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. त्या करिता उत्पादनाचे अनुमान व MSP खरेदी प्रस्ताव हे आक्टोबरच महिन्यात केंद्राकडे सादर झाले पाहिजेत.

राज्याने पिकाखाली क्षेत्र व अनुमानित उत्पादन हे केंद्रला वेळेवर कळवणे; 25% उत्पादन खरेदी प्रस्ताव देणे हा प्राधान्यक्रम आहे. त्यानंतर केंद्र सरकार मंजुरी देते. राज्य सरकारने खरेदी केंद्र सुरू करणे, स्टेट लेवल एजन्सीला बँक गॅरंटी देणे, पुढे स्टेट लेवल एजन्सीने बारदना उपलब्ध करणे आदी कामे क्रमप्राप्त आहेत व ही कामे राज्य सरकारची आहेत.

वरती खासदारांकडे पाठपुरावा करावा असा उल्लेख आहे, तो केंद्र सरकारच्या बाबतीत असून त्याबरोबरच राज्याअंतर्गत पाठपुराव्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तूर एमएसपीच्या खाली ट्रेड होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

यंदा देशात तुरीचे क्षेत्र 50 लाख हेक्टर होते. त्यापासून 44 लाख टन उत्पादन अनुमानित आहे. येत्या हंगाम वर्षांत शिल्लक साठे व नियोजित आयात मिळून एकण पुरवठा साधारण 57 लाख टन होईल. त्या तुलनेत देशांतर्गत तुरीची मागणी 43 लाख टन आहे. म्हणजे पुरवठा आधिक्य आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत येत्या हंगामात तुरीचा पुरवठा अधिक राहील असे दिसते. (आकडेवारी आधार – केंद्रीय कृषी मंत्रालय, नाफेड.)

त्यामुळे जागरूक तूर उत्पादकांना आवाहन आहे, की आपल्या मतदारसंघातील खासदारांना वरील आकडेवारी/ माहिती कळवावी, आणि महाराष्ट्रासाठी आधारभावाने तूर खरेदीचा पुरेसा कोटा मंजूर करून घेण्यासाठी आतापासून दिल्लीत पाठपुरावा करण्याची विनंती करावी.

दीपक चव्हाण,
कृषी अभ्यासक, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments