Saturday, January 28, 2023
HomeAgriculture News‘गोकुळश्री’ स्पर्धेत वंदना जरळी यांची म्‍हैस तर किरण चौगले यांची गाय प्रथम

‘गोकुळश्री’ स्पर्धेत वंदना जरळी यांची म्‍हैस तर किरण चौगले यांची गाय प्रथम

किसानवाणी :
गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते. सन २०२०-२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ७८ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्‍यात आली होती. या स्पर्धेत लक्ष्‍मी विकास सेवा संस्‍था गडहिंग्‍लजच्‍या म्‍हैस उत्‍पादक सौ.वंदना संजय जरळी यांच्‍या म्‍हैशीने एका दिवसात १९.५४० लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गाईंमध्‍ये जनसेवा सह.दूध व्‍याव.संस्‍था दूधगंगानगर क.सांगाव येथील उत्‍पादक किरण शांतिनाथ चौगले यांच्‍या गायीने ३७.२१५ लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.

गोकुळशी सलग्‍न असणा-या सर्व प्रथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदां करीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. गोकुळश्री’ स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे,जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्‍यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायाकडे आकर्षित करणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गेल्‍या २८ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.

            स्‍पर्धेमध्‍ये १ ते ३ क्रमांक असलेले म्‍हैस व गाय उत्‍पादक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-

.नंसंस्थेचे नावगाव
तालुका
स्पर्धकाचे नावदिवसाचे दूध लि. मिलीक्रमांकबक्षीस रक्कम
सन २०२०-२१
मधील म्हैस गटातील
विजेते दूधउत्पादक









१.लक्ष्‍मीगडहिंग्‍लज
गडहिंग्‍लज
वंदना संजय जरळी१९.५४०प्रथम२५०००
२.हरहर महादेवचिखली
कागल
अमर यशवंत पाटील१९.१३०द्वितीय२००००
३.लक्ष्‍मीगडहिंग्‍लज
गडहिंग्लज
वंदना संजय जरळी१९.०१०तृतीय१५०००
सन २०२०-२१ मधील गाय गटातील विजेते दूधउत्पादक








१.जनसेवा
दूधगंगानगर क.सांगाव
कागलकिरण शांतीनाथ चौगले३७.२१५प्रथम२००००
२.माणगांव
माणगांव
हातकणंगलेअमोल पारीसा मगदूम३४.८०५द्वितीय१५०००
३.गांगोलिंग
श्रीनगर व्‍हनगुती
भुदरगडअनिकेत अजित पाटील३२.३५०तृतीय१००००










या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गाव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्‍यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले आहे. 

आमची कृषी पत्रकारिता समृध्द करण्यासाठी सहकार्य करा
प्रिय वाचक, आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य गरजेचे आहे. वरील लिंक वर क्लिक करून सहकार्य करा..!
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments