Homeतंत्रज्ञानशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढ

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढ

किसानवाणी : केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत सुक्ष्म सिंचन योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेल्या खर्च मर्यादांमध्ये आता १० ते १३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारने ठिबक व तुषार सिंचनासाठीची खर्चमर्यादा व त्यावर द्यायचे अनुदान हे २०१६ मध्ये निश्चित केले होते. यामध्ये बदल करावा अशी मागणी राज्यातील ठिबक उद्योग कृषी विभागाकडून सातत्याने होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्यामध्ये बदल केले आहेत.

१.२ मिटर × ०.६ मीटर लागवड अंतरासाठी एक ट्रॅक्‍टर व ठिबक संच बसवल्यास २०१६ च्या नियमावलीनुसार १ लाख १२ हजार २३६ रुपये अनुदान मिळत होते. आता नवीन नियमावलीनुसार हे अनुदान १ लाख २७ हजार ५०१ रुपये मिळेल. तुषार संचासाठी एक हेक्टरला १९ हजार ५४२ रुपये अनुदान मिळत होते. आता नवीन नियमावलीनुसार यासाठी २१ हजार ५५८ रुपये अनुदान मिळेल.

सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेत  पर्यायी सामग्री ला देखील अनुदान मिळते. म्हणजेच खत टाकी, कचरा गाळणी, माती व अन्य जड घटक वेगळे करणारे उपकरण या प्रकारची पर्यायी सामग्री पूर्वी केंद्राचे अनुदान कक्षेत होती परंतु आता नवीन नियमानुसार सॅण्ड फिल्टर, हायड्रो सायक्लोन फिल्टर, फर्टिलायझर्स टॅंक व ठिबक नळी गुंडाळणारी अवजार देखील आता या अनुदान कक्षात आले आहे.

  • ठिबक संचाच्या खर्च मर्यादेत १३.५९ टक्के वाढ
  • तुषार संच खर्च मर्यादेत १०.४६ टक्क्यांनी वाढ
  • नवीन नियमावलीत अर्धा एकर क्षेत्राचा समावेश
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या राखीव निधीत अर्धा टक्‍क्‍यांनी वाढ
  • ठिबकसाठीच्या इतर अवजारांना देखील अनुदान

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील छोटे शेतकरी अर्धा एकरामध्ये देखील ठिबक संच बसवतात. परंतु पूर्वीच्या नियमावलीमध्ये छोट्या अंतरासाठी अनुदानाची तरतूद नव्हती. केंद्र शासनाला हा मुद्दा देखील  कळविण्यात आला होता. त्याला देखील केंद्राने मान्यता दिली असून आता नवीन अनुदान नियमावलीत दीड मीटर बाय दीड मीटर असे नवे अंतर ग्राह्य धरण्यात आल्यामुळे आता छोट्या शेतकऱ्यांना देखील एक लाख २१ हजार ५५६ रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments