पापड उद्योगातून जपली मैत्री; कसबा सांगावच्या ‘त्या’ तिघींच्या जिद्दीची अनोखी यशोगाथा

किसानवाणी : एकमेकींच्या अडीअडचणी, सुख दुखांची देवाण घेवाण करता करता, त्या कधी एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी बनल्या त्यांचं त्यांनाच समजलं नाही. ही मैत्रीची वीण आणखी घट्ट करण्यासाठी त्या तिघींनी मिळून स्वतःचा पापड उद्योग सुरू केला. या पापड उद्योगातूनच ‘त्या’ आता आत्मनिर्भरही बनल्या असून यशस्वी उद्योजिका होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. शिल्पा पाटील, स्वप्नाली उपाध्ये आणि संगिता पाटील अशी या तीन मैत्रीणींची नावे असून आज आपण त्यांची प्रेरणादायी यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव या गावी जाणार आहोत. (पहा व्हीडीओ)