Homeपशुसंवर्धनकोरोनामुळे पुन्हा 'कडकनाथ'ला चांगले दिवस

कोरोनामुळे पुन्हा ‘कडकनाथ’ला चांगले दिवस

किसानवाणी :
कोरोनामुळे अनेक व्यवसाय तोट्यात गेले तर काही व्यवसाय नफ्यात आले. सध्या असाच एक व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फायद्यात आला असून ‘कडकनाथ पोल्ट्री फार्मिंग’ असे या व्यवसायाचे नाव आहे. या व्यवसायाची सांगली जिल्ह्यातील एका कंपनीमुळे महाराष्ट्रात नाचक्की झाली असली तरी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील या कोंबड्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून मागणी वाढली आहे. 

मध्यप्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडकनाथची मागणी घटली होती, परंतु अनलॉकची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कडकनाथ कोंबड्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. आणि ही मागणी सातत्याने वाढत आहे. मध्यप्रदेश सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार कडकनाथ कोंबड्यांची वाढती मागणी ध्यानात घेता, पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी राज्य सरकारने उत्पादन आणि विक्रीत वाढ करण्याच्या उद्देशाने योजना तयार केली आहे. 

कडकनाथ कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी तत्वावरील कुक्कुटपालन योजना राबवली जात आहे. याठिकाणी झाबुआ, अलिराजपूर, बडवानी, आणि धार जिल्ह्यातील नोंदणीकृत कुक्कुटपालकांमध्ये ३०० सदस्य कडकनाथ कुक्कुटपालन करत आहेत. सध्या देशभरातील कुक्कुटपालक कडकनाथची पिल्ले नेण्यासाठी झांबुआमध्ये मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती झाबुआच्या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख तोमर यांनी दिली आहे. तर दिल्लीमध्ये कडकनाथ कोंबड्यांची किंमत ८५० ते १००० रूपयांच्या दरम्यान पोहचली आहे. 

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकनाथची मागणी वाढत असली तरी याबाबतीत कोणताही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही. असे असले तरी कडकनाथ कोंबड्यांच्या मटणात असलेले औषधी गुणधर्म, प्रोटीनचे सर्वाधिक प्रमाण, त्यातुलनेत चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे कमी प्रमाण यामुळेच ही मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments