Homeयोजनाआता शेतकऱ्यांना मिळतील 36000 रुपये वार्षिक, जाणून घ्या या सरकारी योजनेबद्दल

आता शेतकऱ्यांना मिळतील 36000 रुपये वार्षिक, जाणून घ्या या सरकारी योजनेबद्दल

किसानवाणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच पीएम किसान सन्मान निधी ही एक योजना आहे. ही शासनाची अशी योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये हस्तांतरित केले जातात. सरकार हे पैसे 3 समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच, केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते.

नमस्कार शेतकरी बंधूनो, आपलं आवडतं भारत अ‍ॅग्री अ‍ॅप देतयं सर्व पिकांविषय़ी शास्त्रीय माहिती. यामध्ये आपल्याला मिळेल प्रत्येक पिकाची संपूर्ण माहिती, तीही एका क्षणात. चला तर लगेचच डाऊनलोड करा भारत अ‍ॅग्री अ‍ॅप आणि करा आपल्या पीकांचे उत्तम व्यवस्थापन. BharatAgriApp

पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे शेतकरी वार्षिक 36,000 रुपयांचाही लाभ घेऊ शकतात. म्हणजेच, शेतकऱ्यांना 3 महिन्यांत 2,000 रुपये मिळतात आणि या योजनेद्वारे दरमहा 3,000 रुपये मिळू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही वेगळ्या कागदपत्रांची गरज भासत नाही.

Natraj AS-553AL Japanese Technology Tractor Mounted/Motor Operated Agriculture Sprayer Pump for Irrigation/Farming and Plants 30-50 Litre per Minute with 8 Inch Pulley

36,000 रुपये वार्षिक मिळवायचे कसे?
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त कागदपत्रांची गरज नाही. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जमा केलेल्या कागदपत्रांवरच ही योजना शेतकऱ्यांना लागू केली जाते.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो
१ . या योजनेचा लाभ 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.
२. या अंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन असावी.
३. योजनेअंतर्गत मासिक पैसे 55 ते 200 रुपयांपर्यंत किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे भरावे लागतील. हे शेतकऱ्याच्या वयानुसार ठरवले जाते.
४. 18 वर्षे वयोगटात सामील झालेल्या शेतकऱ्यांना मासिक 55 रुपये दिले जातील.
५. वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही या योजनेत सामील झाल्यास 110 रुपये जमा करावे लागतील.
६. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना
जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत असेल. तर तुम्ही पीएम किसान मानधन योजनेत ते पैसे वळते करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments