नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सोशल मिडीयाव्दारे पत्र…

किसानवाणी :
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्यसरकारने केली. ही घोषणा केल्यानंतर बराच कालावधी लोटला तरीही अद्याप अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने १ रूपयाचेही प्रोत्साहनपर अनुदान दिलेले नाही. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी आता सोशल मिडीयाच्या व्दारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांना पत्र लिहिले आहे. (Mahatama Phule Farmer Loan Waiver Scheme)

या पत्राव्दारे एक मतदाता शेतकरी म्हणून, शेतकरी पुन्हा आत्महत्या करू नये आणि कर्जात अडकू नये असे वाटत असेल तर तात्काळ ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान जमा करा अशी विनंती करण्यात आली आहे.