Saturday, February 4, 2023
HomeGovt. schemeमहात्मा फुले कर्जमाफी योजना : कोल्हापूर जिल्ह्याची ८ वी यादी जाहीर; 'येथे'...

महात्मा फुले कर्जमाफी योजना : कोल्हापूर जिल्ह्याची ८ वी यादी जाहीर; ‘येथे’ एका क्लिकवर तपासा यादी

किसानवाणी : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभार्थ्यांची आठवी यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. ही कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज या योजनेव्दारे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

किसानवाणीच्या वाचकांना आपण इथे तीन जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध करून देणार आहोत, बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन यादी मध्ये नाव आहे का ते तपासून आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. (खालील लिंकवर क्लिक करून यादी डाऊनलोड करा)

महात्मा फुले कर्जमाफी यादी – कोल्हापूर
महात्मा फुले कर्जमाफी यादी – रत्नागिरी
महात्मा फुले कर्जमाफी यादी – पुणे

प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी वरील प्रसिध्द केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँक शाखे मध्ये जावून प्रमाणीकरण करुन घ्यावे. (आधार प्रमाणीकरणाची सोय स्वस्त धान्य दुकानात सुध्दा उपलब्ध करुन दिलेली आहे).
प्रमाणीकरणासाठी जाताना शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड, बचत खात्याचे पासबुक, आणि यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक स्वत: लिहून घेऊन जावा.

काही विसंगती असल्यास पोर्टलवर असहमतीचे बटण दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकतो. उपरोक्त कर्जखात्यांची यादी अंतिम नसून, बँकांकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्जखात्यांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments