Saturday, February 4, 2023
HomeGovt. schemeमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना: प्रोत्साहनपर अनुदानाबाबत शरद पवार यांचा राज्य सरकारला...

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना: प्रोत्साहनपर अनुदानाबाबत शरद पवार यांचा राज्य सरकारला महत्वाचा सल्ला

किसानवाणी : महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे सरकारला महत्वाचा सल्ला दिला आहे. लोकसत्ता वृत्तसमूहाने याबाबतची बातमी दिली आहे.

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी झाली असली तरी, वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांना अद्याप मदत करणं बाकी असल्याची आठवण राज्यातील ठाकरे सरकारला करून दिलीय. या शेतकऱ्यांना मदत बाकी आहे म्हणून राज्य सरकारने आर्थिक परिस्थिती नसेल तर कर्ज काढावे, अशी मागणी केली आहे. तसेच हा कर्जमाफीचा निर्णय एकदम शक्य नसेल तर १ वर्षात २-३ टप्प्यात घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्जाच्या मूळ रकमेत माफी झाली. पण त्याशिवाय वेळेवर पैसे भरले त्यांना मदत करण्याचाही निर्णय घेतला होता. त्याचा काही भाग अद्यापही बाकी आहे. म्हणून राज्य सरकारशी बोलून त्याचाही निकाल घ्यावा लागेल. सरकारची परिस्थिती अडचणीची असली तर आम्ही सरकारला कर्ज काढा अशी विनंती करू. पण शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाच्या माफीचा निर्णय किमान १ वर्षात २-३ टप्प्यात करा,” अशी मागणी शरद पवारांनी राज्य सरकारकडे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments